"मंदार पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारताच्या बिहार राज्यातल्या बंका जिल्ह्यात एका ७०० फूट उंचीच्य... |
(काही फरक नाही)
|
१५:२६, ११ सप्टेंबर २०१७ ची नवीनतम आवृत्ती
भारताच्या बिहार राज्यातल्या बंका जिल्ह्यात एका ७०० फूट उंचीच्या टेकडीला मंदार पर्वत म्हणतात. हा भागलपूर शहराच्या दक्षिणेला सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार या पर्वताचा रवीसारखा उपयोग करून देव-दानवांनी कूर्म जयंतीच्या दिवशी समुद्र मंथन केले होते.
मंदार पर्वत नावाचे हे ठिकाण एक तीर्थस्थान समजले जाते. या टेकडीवरील पठारावर एक हिंदू आणि एक जैन मंदिर आहे. जवळच 'पापहरणी' नावाचा तलाव आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या देवळात लक्ष्मी आणि विष्णूच्या मूर्ती आहेत.