Jump to content

"मनोज पांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (जन्म : नागपूर, १९६२) हे पुण्यात असलेल्या...
(काही फरक नाही)

१४:३३, १० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (जन्म : नागपूर, १९६२) हे पुण्यात असलेल्या भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख आहेत.

पांडे यांचे वडील डॉक्टर होते. त्यांचे कुटुंब नागपुरात शहरापासून दूर असलेल्या विद्यापीठ परिसरात राहायचे. तेव्हा त्या भागात शाळा नव्हती. जवळच असलेल्या वायुसेनानगरात केंद्रीय विद्यालय होते, पण तिथे बाहेरच्यांना प्रवेश नव्हता. डॉ. पांडे यांनी हवाई दलातील अधिकार्‍यांना विनंती करून मुलगा मनोज याला या शाळेत प्रवेश मिळवून दिला. या शाळेच्या लष्करी शिस्तीत मनोज पांडे रमले व तिथूनच त्यांना सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे मामा बेळगावला मराठा लाईट इन्फंटरीत होते. त्यांचे लहान बंधू संकेतसुद्धा लष्करात कर्नल होते.

अकरावी उत्तीर्ण केल्यावर मनोज पांडे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत दाखल झाले. तेथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते पुण्याच्याच बॉम्बे सॅपर्स या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले.

देशात आणि परदेशांत

मनोज पांडे यांची देशाच्या सर्व भागांत नोकरी झाली आहे.त्यांनी इथिओपिया व इरिशिया या देशांत संयुक्त राष्ट्राच्या शांतिसेनेतसुद्धा काम केले आहे. कारगिलमध्ये ते डिव्हिजनचे कमांडर होते.

नातेवाईक

मनोज पांडे यांचे वडील नागपूरला डॉक्टर तर आई प्रेमा पांडे नागपूर आकाशवाणीत उद्‌घोषिका होत्या. त्या सादर करीत असलेल्या ‘बेला के फूल’ हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. मनोज पांडे यांचे मामा बेळगावला मराठा लाईट इन्फंटरीत, तर लहान बंधू संकेत पांडे हे लष्करात कर्नल होते. सर्वात लहान बंधू डॉ. केतन पांडे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सध्या (२०१७ साली) कार्यरत आहेत.



(अपूर्ण)