"हिमांशु कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: हिमांशु कुलकर्णी हे एक मराठी गझलकार आहेत. ते बडोद्याच्या महाराज... |
(काही फरक नाही)
|
१५:४३, २१ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
हिमांशु कुलकर्णी हे एक मराठी गझलकार आहेत. ते बडोद्याच्या महाराजा सयाजी विद्यापीठातून बी.टेक.चे सुवर्णपदक प्राप्त पदवीधर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून त्यांनी एम.बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. प्रारंभी सोलापूर येथील लक्ष्मी विष्णु मिल्समध्ये जनरल मॅनेजरची नोकरी करून पुढे पुण्यात कल्याणी ब्रेक्स येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. पेशाने ते उच्च व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून उद्योग जगतात गेली ५० वर्षे काम करीत असले तरी ते अनेक वर्षे काव्यरचना करीत आहेत.
हिमांशु कुलकर्णी यांचे काव्यसंग्रह
- क़तरा क़तरा गम (उर्दू)
- कविता उद्ध्वस्त रात्रींच्या
- पणती जपून ठेवा
- बाभुळवन
- मी-माझी सावली
- शहर-एक कबर
- ह्या पाणपोयीवर मिळते फक्त तहान
हिमांशु कुलकर्णी यांच्या काव्याच्या ध्वनिफिती
- चाहूल चांदण्यांची (केवळ गझलांचा अल्बम-संगीतकार अशोक पत्की; गायक पूजा गायतोंडे आणि दत्तप्रसाद रानडे)
- व्यथा चंदेरी (संगीतकार गिरीश जोशी)
- क्षितिज (संगीतकार रवी दाते)