Jump to content

"सरस्वती (दीर्घिकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर्घिकांचा एका प्रचंड मोठा समूह (सुपरक्‍लस्टर) आहे. त्याचा शोध [[पुणे|पुण्यातील]] 'आयुका' आणि 'आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी ‘स्लोअन डिजिटल स्काय सव्हे'च्या आधारे लावला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. या शोधासंबंधीचा लेख अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या 'द अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल' या मानाच्या नियतकालिकात ऑगस्ट २०१७च्या अंकात छापला जाईल.
सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर्घिकांचा एका प्रचंड मोठा समूह (सुपरक्‍लस्टर) आहे. त्याचा शोध [[पुणे|पुण्यातील]] 'आयुका' (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) आणि 'आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी ‘स्लोअन डिजिटल स्काय सव्हे'च्या आधारे लावला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. या शोधासंबंधीचा लेख अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या 'द अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल' या मानाच्या नियतकालिकात १९ जुलै २०१७च्या अंकात छापला जाईल.


सरस्वती या दीर्घिका समूहात हजारो दीर्घिका आहेत. त्यांतील कित्येक आपल्या आकाशगंगेहूनही प्रचंड मोठ्या आहेत. आकाशात हा समूह [[रेवती]] नक्षत्राच्या दिशेला आहे.
सरस्वती या दीर्घिका समूहात हजारो दीर्घिका आहेत. त्यांतील कित्येक आपल्या आकाशगंगेहूनही मोठ्या आहेत. आकाशात हा समूह [[रेवती]] नक्षत्राच्या दिशेला आहे. अवकाशातील महासमूह (सुपरक्लस्टर) ही आकाशगंगांची साखळी असते. या आकाशगंगा किंवा आकाशगंगांचे समूह गुरुत्वाकर्षणाने एकमेकांना जोडलेले असतात. आकाशगंगांबरोबर वायू, ‘डार्क मॅटर’ आणि मोकळ्या जागा असे विविध घटक एकत्र येऊन ते बनलेले असतात. आपली आकाशगंगा (‘मिल्की वे’) ही अशाच ‘लानिआकिआ’ नावाच्या महासमूहाचा एक भाग आहे.

अवकाशातून प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे विश्वाचे वय जेव्हा एक हजार कोटी वर्षे होते, तेव्हा सरस्वती महासमूह जसा होता, तसा तो आता पाहायला मिळाला आहे. आकाशगंगांच्या आयुष्यात त्या अशा महासमूहांमध्ये फिरत राहतात. त्यामुळे आकाशगंगांची निर्मिती कशी होते ते जाणून घेण्यासाठी अवकाशातील महासमूह शोधणे आणि त्यातील विविध प्रकारच्या वातावरणाचा आकाशगंगांवर होणारा परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे. खगोलशास्त्रातील या नव्या संशोधन क्षेत्रास ‘सरस्वती’ महासमूहाच्या शोधामुळे चालना मिळाली आहे.





१५:४१, १४ जुलै २०१७ ची आवृत्ती

सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर्घिकांचा एका प्रचंड मोठा समूह (सुपरक्‍लस्टर) आहे. त्याचा शोध पुण्यातील 'आयुका' (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) आणि 'आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी ‘स्लोअन डिजिटल स्काय सव्हे'च्या आधारे लावला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. या शोधासंबंधीचा लेख अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या 'द अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल' या मानाच्या नियतकालिकात १९ जुलै २०१७च्या अंकात छापला जाईल.

सरस्वती या दीर्घिका समूहात हजारो दीर्घिका आहेत. त्यांतील कित्येक आपल्या आकाशगंगेहूनही मोठ्या आहेत. आकाशात हा समूह रेवती नक्षत्राच्या दिशेला आहे. अवकाशातील महासमूह (सुपरक्लस्टर) ही आकाशगंगांची साखळी असते. या आकाशगंगा किंवा आकाशगंगांचे समूह गुरुत्वाकर्षणाने एकमेकांना जोडलेले असतात. आकाशगंगांबरोबर वायू, ‘डार्क मॅटर’ आणि मोकळ्या जागा असे विविध घटक एकत्र येऊन ते बनलेले असतात. आपली आकाशगंगा (‘मिल्की वे’) ही अशाच ‘लानिआकिआ’ नावाच्या महासमूहाचा एक भाग आहे.

अवकाशातून प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे विश्वाचे वय जेव्हा एक हजार कोटी वर्षे होते, तेव्हा सरस्वती महासमूह जसा होता, तसा तो आता पाहायला मिळाला आहे. आकाशगंगांच्या आयुष्यात त्या अशा महासमूहांमध्ये फिरत राहतात. त्यामुळे आकाशगंगांची निर्मिती कशी होते ते जाणून घेण्यासाठी अवकाशातील महासमूह शोधणे आणि त्यातील विविध प्रकारच्या वातावरणाचा आकाशगंगांवर होणारा परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे. खगोलशास्त्रातील या नव्या संशोधन क्षेत्रास ‘सरस्वती’ महासमूहाच्या शोधामुळे चालना मिळाली आहे.