Jump to content

"दिलीप वि. चित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|दिलीप पु. चित्रे}} दिलीप वि. चित्रे (मृत्यू : सन सिटी सेंटर-फ्...
(काही फरक नाही)

२१:४०, २ जुलै २०१७ ची आवृत्ती

दिलीप वि. चित्रे (मृत्यू : सन सिटी सेंटर-फ्लॉरिडा (अमेरिका), ३० जून २०१७) हे अमेरिकेत स्थायिक झालेले एक मराठी कवी आणि लेखक होते.

अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं 'अलिबाबाची हीच गुहा' हे त्याचे नाटक खूप गाजले होते. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले. इ.स. १९७०च्या दशकात जगभरातील वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असलेल्या लेखकांकडून लिहून घेतलेल्या कथांचा एक मोठा प्रकल्प त्यांनी अंगीकारला होता. त्‍यावर आधारित 'कुंपणाबाहेरचे शेत' नावाचा कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता.

अमेरिकेतील मराठी मंडळांच्या सांस्कृतिक कार्यात ते नेहमी पुढाकर घेत असत. तसेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर स्थापनेपासून ते कार्यरत होते..