"राहुल कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: राहुल कोसंबी हे एक तरुण मराठी लेखक आहेत. ते एम.ए. झाले असून ‘दलित न... |
(काही फरक नाही)
|
२१:०२, २८ जून २०१७ ची आवृत्ती
राहुल कोसंबी हे एक तरुण मराठी लेखक आहेत. ते एम.ए. झाले असून ‘दलित नवमध्यमवर्ग’ हा विषय़ घेऊन पीएच.डी. करीत आहेत. (जून २०१७)
यापूर्वीची दहा ते बारा वर्षे ते विविध सामाजिक विषयांवर राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक अंगाने लेखन करत आहेत. विद्यार्थी असताना त्यांनी लोकवाङ्मय गृहामध्ये ग्रंथनिर्मिती, संपादन याचा अनुभव घ्यायला सुरुवात केली आणि मग ही प्रक्रिया त्यांच्या आनंदाचा विषय बनली. आता ‘मुक्त शब्द’साठीही ते संपादकीय सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळतात. या अनुभवांचा फायदा त्यांना लेखनातही झाला. सध्या राहुल कोसंबी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ या संस्थेच्या मराठी आणि कोकण विभागाची संपादकीय जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारीही सोपवण्यात आहे. या संस्थेच्या माध्यमातून युवकांना वाचनाकडे वळवण्यासाठीही त्यांचे विविध प्रयोग सुरू असतात.
राहुल कोसंबी यांना त्यांच्या ‘उभं आडवं’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार मिळाला आहे. (जून २०१७)
उभं आडवं’ या पुस्तकात कोसंबी यांचे साहित्य, संस्कृती, दलित अत्याचार अशा विविध विषयांवरील निबंध एकत्रित केले आहेत.