"गणपराव नलावडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: गणपत महादेव नलावडे (जन्म : पुणे, १० फेब्रुवारी, इ.स. १९९८; मृत्यू : ??) ह... |
(काही फरक नाही)
|
२२:५६, २७ जून २०१७ ची आवृत्ती
गणपत महादेव नलावडे (जन्म : पुणे, १० फेब्रुवारी, इ.स. १९९८; मृत्यू : ??) हे विनायक दामोदर सावरकरसावरकरांचे सहकारी आणि हिंदुमहासभेचे वरिष्ठ नेते होते. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा कारखाना होता. तो बंद करून पुढे ते शेती करू लागले. गणपतराव मॅट्रिकपर्यंतच शिकले.
गणपतरावांनी सन १९२२मध्ये एक छापखाना काढला. त्या छापखान्यातून ते ‘संग्राम’ नावाचे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करीत. सन १९२५मध्ये चालू झालेले ते साप्ताहिक १९३२मध्ये बंद पडले. १९२८ ते १९५४ या काळात गणपतराव आधी पुणे नगरपालिकेचे, आणि १९५०साली महानगरपालिका झाल्यावर तिचे सदस्य बनले. १९४२ साली ते नगरपालिकेचे चेअरमन झाले, व कालांतरने पुणे महापालिकेचे महापौर.
१९६४ साली गणपतराव नलावडे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे ते ४४ वर्षे चेअरमनआणि एकूण सहा वेळा अध्यक्ष झाले. ते १९५४ ते १९६२ या कालावधीत महाराष्ट्र प्रांतिक हिंदुमहासभेचे सदस्य होते. गांधींची हत्या झाल्यावर त्यांचा छापखाना राजकीय गुंडांनी १९४८ साली जाळला. गांधीहत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून गणपतरावांना १९४८मध्ये आणि १९५०मध्ये असा दोन वेळा चारचार महिने तुरुंगवास भोगावा लागला.
सन्मान
- गणपतराव नलावडे हे हिंदुमहासभेच्या पुणे येथे १९७५ साली झालेल्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष होते.
़