Jump to content

"लक्ष्मीबाई वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लक्ष्मीबई वैद्य (माहेरच्या पटवर्धन, जन्म ३० जून १९०४) या पाकक्रिय...
(काही फरक नाही)

१७:३२, २० जून २०१७ ची आवृत्ती

लक्ष्मीबई वैद्य (माहेरच्या पटवर्धन, जन्म ३० जून १९०४) या पाकक्रियेवरचे पहिले परिपूर्ण मराठी पुस्तक लिहिणार्‍या लेखिका होत्या.

१९२८ ते १९३५ या काळात लक्ष्मीबाई बनारस विद्यापीठाच्या मुलींच्या शाळेत शिक्षिका होत्या. या काळात त्या मध्य प्रदेशात फिरून आल्या. त्यानंतर त्या पुण्याच्या हुजूरपागा शाळेत गृहशास्त्र विषयाच्या मुख्य शिक्षिका झाल्या. त्यांची भारतातील शाळा-महाविद्यालयांतून परीक्षिका म्हणून आणि इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रोम अशी चौफेर भ्रमंती झाली होती. तीस वर्षांच्या पाकशास्त्र विषयाच्या शिक्षिका असल्याच्या त्यांच्या अनुभवावर त्यांनी पाकसिद्धी नावाचे पुस्तक लिहिले, ते १९६९ मध्ये प्रकाशित झाले. २०१६ साली या पुस्तकाची पाचवी आवृत्ती ‘परिपूर्ण पाकसिद्धी’ या नावाने प्रसिद्ध झाली.

गृहशास्त्रावरील परिपूर्ण पुस्तक

पुस्तकाच्या पहिल्या दहा प्रकरणांमध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी त्यामागील शास्त्र, आहार, आरोग्य यांची माहिती देणारी आहेत. शिवाय वजने-मापे, स्वयंपाकघराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, भांडीकुंडी व उपकरणे यांची निवड आणि देखरेख, भाजीपाला, किराणा सामान कसे निवडावे, अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्या मागची शास्त्रीय कारणे, तसेच पदार्थाची आकर्षक मांडणी, सजावट, दूधदुभते, सरपण इतकेच नव्हे तर मोरी आणि संडासाची स्वच्छता हे विषय सविस्तर हाताळले आहेत. पुढची प्रकरणे प्रत्यक्ष पाककृतींसाठी आहेत.

पुस्तकात केलेले पदार्थांचे वर्गीकरण

पुस्तकात भाज्यांसकट सर्वच खाद्यपदार्थांचे वर्गीकरण केले आहे.

सूची

पुस्तकाच्या शेवटी दिलेल्य विषयसूचीमुळे पदार्थ शोधताना अडचण येत नाही.