Jump to content

"अभिजीत देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अभिजित देशपांडे हे एक चित्रपट संकलक (एडिटर) आहेत. मुळात आवडीने ‘ह...
(काही फरक नाही)

१२:२९, १७ जून २०१७ ची आवृत्ती

अभिजित देशपांडे हे एक चित्रपट संकलक (एडिटर) आहेत. मुळात आवडीने ‘हॉटेल मॅनेजमेंट’ केलेले देशपांडे Indian Magic Eye Motion Pictures (IME) या संस्थेमध्ये सिनेएडिटर असलेल्या मोहन टाकळकर या मित्राच्या सांगण्यावरून IMEमध्ये काम करू लागले. तीन वर्षे तेथे काम केल्यावर ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्य़ूटमध्ये एडिटिंग शिकायला आले.

स्वयंपाक आणि एडिटिंग

एडिटिंग शिकत असतानाही अभिजित देशपांडे यांच्यातली स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुण्यात त्यांची आतेबहीण शुभदा जोशी कुकिंग क्लासेस घ्यायची. शुभाताईंच्या त्या क्लासमधल्या महिलावर्गाला मांसाहारी पदार्थ शिकवायला व शुभाताईंबरोबर पुण्यातल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जाऊन तिथले खास पदार्थ मागवून ते कसे केले असतील ते लिहून काढायला त्यांनी सुरुवात केली. शेफचे कामाचे तास संपेपर्यंत स्टाफ गेटपाशी वाट पाहून ते शेफकडून पाककृती घ्यायचे आणि प्रयोग करायचे.

शुभाताईबरोबर घेतलेल्या क्लासेसमधून बर्‍यापैकी पैसेही मिळायचे. त्या पैशातूनच देशपांडे यांनी एफ.टी.आय.आय.ची दुसर्‍या वर्षांची फी भरली. एडिटिंगचा अभ्यास चालू असताना चित्रपट महोत्सवांन व स्पेशल स्क्रीनिंग्जना आवर्जून हजेरी लावत. चित्रपट पाहताना त्याच्या एडिटिंगबद्दल निरीक्षण करत. त्यामुळे त्यांन प्रत्यक्ष एडिटिंग करताना त्यातल्या तांत्रिक बारकाव्यांकडे लक्ष देण्याची त्यंन सवय लागली.