"सुमेधा कामत देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुमेधा आनंदराव कामत प्रभू पार्सेकर देसाई या एक कोंकणी-मराठी निस... |
(काही फरक नाही)
|
१२:३८, ९ जून २०१७ ची आवृत्ती
सुमेधा आनंदराव कामत प्रभू पार्सेकर देसाई या एक कोंकणी-मराठी निसर्गप्रेमी लेखिका आहेत. पारोड (केंपे-गोवा) हे त्यांची मुळचे गाव. त्या मराठीच्या प्राध्यापिका आहेत. सुमेधा कामत देसाई यांना पदभ्रमण आणि अरण्यनिवास यांची खास आवड आहे. या निमित्ताने त्यांनी भारतातील अनेक ठिकाणांची व नेपाळ, भूतान, कतार, दुबई, श्रीलंका, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, जर्मनी, स्विट्झरलँड, अशा अनेक आशिया-युरोपातील देशांची आणि अमेरिकेसह बहामाज बेटांची सफर केली आहे.
सुमेधा कामत देसाई यांनी लिहिलेली पुस्तके
- आंबाड्याच्या घरात (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक)
- आलतड पलतड (कोंकणी, प्रवासवर्णन)
- उपवन (मराठी, वृक्षविषयक)
- क्रॉस वाहणारी माणसे (मराठी, व्यक्तिचित्रणे)
- चंद्रकोरीच्या चार कला (मराठी, प्रवासवर्णन)
- चित्रंगी (मराठी, ललितगद्य)
- तेफळां घोंस (विनोदी, कोंकणी)
- देवकापसाची वात (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक)
- देवांचे काव्य (मराठी, प्रवासवर्णन)
- निवलकांडयेचीं बोंडां (विनोदी, कोंकणी)
- नैनी डेज (मराठी, प्रवासवर्णन)
- पालवा पान (कोंकणी. निसर्ग, लोकजीवन आणि संस्कृतीविषयक)
- पोपटी रेषा (मराठी, प्राणिविषयक) (२०१६)
- मैत्र जीवांवे (मराठी, ललितगद्य)
- रानभूल (मराठी, प्राणिपक्ष्यांवरचे ललितगद्य) (१९९४)
- विवेकानंदपुरमात (कोंकणी, प्रवासवर्णन)
- शेवण्या पिपुशा (कोंकणी, प्राणिपक्षीविषयक ललितगद्य) (१९९७)
- शेळी सांत (विनोदी, कोंकणी)
- सतत अणि अथक (मराठी, प्रवासवर्णन)
- सूर्यप्रकाश आणि समुद्र (मराठी, प्रवासवर्णन)
सुमेधा कामत देसाई यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- ‘आंबाड्याच्या घरात’ला गोवा महिला आणि बालविकास खात्याकडून ‘यशोदामिनी’ पुरस्कार (२०११-१२)
- ‘आंबाड्याच्या घरात’ला गोव्यातील बिम्ब प्रकाशनाचा ‘शंकर भांडारी विनोदी कोंकण साहित्य पुरस्कार’ (२०१३)
- ‘उपवन’ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार
- गोवा राज्य शिक्षण संचालनालयातर्फे ‘आदर्श अध्यापक राज्य पुरस्कार’.(२०१५-१६)
- ‘रानभूल’चा गोवा विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश (२०१४)
- ‘रानभूल’ला गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार
- ‘रानभूल’ला महाराष्ट्र राज्याचा प्रथम प्रकाशन - ललितगद्य उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१९९६)
- ‘रानभूल’ला बेळगावच्या सांगाती अकादमीचा पुरस्कार
- ‘विवेकानंदपुरमात’ला १९९३ सालचा गोवा कला अकादमीचा पुरस्कार
- ‘विवेकानंदपुरमात’ला मणिपालच्या डॉ. टी.एम.ए. पै फाऊंडेशनचा पुरस्कार