Jump to content

"मधुकर विश्वनाथ लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मधुकर विश्वनाथ लिमये हे ईशान्य भारतातल्या आसामच्या निरनिराळ्य...
(काही फरक नाही)

१२:५१, ८ जून २०१७ ची आवृत्ती

मधुकर विश्वनाथ लिमये हे ईशान्य भारतातल्या आसामच्या निरनिराळ्या भागांमध्ये ६० वर्षे वस्तव्य करून राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. एखाद्य सेवव्रती व्यक्तीप्रमाणे त्यांनी संघाचे कार्य तेथे रुजवले अणि वाढवले. तेथील तळागाळातील लोकांना भारतीयांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व तेथील जीवनमान उंचवण्यासाठी संघाकडून होत असलेल्या कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.

मधुकर लिमये यांनी आपल्या अनुभवांवर आधरित ‘खट्टी मिठ्ठी यादे’ नावाचे हिंदी पुस्तक लिहिले. त्याचा ’आंबट गोड आठवणी’ नावाचा मराठी अनुवाद कु. शिल्पा शशिकांत वाडेकर यांनी केला आहे.

हे पुस्तक म्हणजे हा आसामच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघकार्याचा इतिहास नसून विसाव्या शतकाच्या मध्यात आसामात आलेल्या एका कार्यकर्त्याच्या अनुभवांचे हे चित्रण आहे. पुस्तक वाचून आसामच्या संघकार्यात सुरुवातीला आलेल्या अडचणी, तसेच मिळालेला पाठिंबा ह्या दोन्हींची जाणीव वाचकाला होऊ शकेल. संघकार्याच्या कालखंडाचा प्रत्यक्षदर्शी अशी लेखकाची भूमिका आहे. पुस्तक वाचून आसामात कार्य करायला येणार्‍या नवीन कार्यकर्त्यांना एखादा संदेश मिळावा अशी लेखकाची अपेक्षा आहे. आपल्या सर्व अनुभवांना अभिव्यक्त करणे लेखकाला शक्य नसल्याने त्याने काही निवडक घटनांचा समावेश केला आहे. यात तत्कालीन परिस्थिती, संकटे, आव्हाने याचे वर्णन आहे. कार्यकर्ता म्हणून लेखकाचा कस कसाकसा लागत गेला, याचे हे प्रांजल कथन आहे.

अन्य भारतीयांच्या मनात ईशान्येकडील राज्यांतील रहिवाश्यांबद्दल आपलेपणाची भावना रूजविण्यासाठी या आठवणी उपयुक्त आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, त्याचे महत्त्व आणि स्वसुखावर तुळशीपत्र ठेवून राष्ट्रभक्तीसाठी त्याग करणार्‍या प्रचारकांचे जीवन याची माहिती या आठवणीतून मिळते.