Jump to content

"बालचित्रवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बालचित्रवाणी ही एक राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आहे. हिला भ...
(काही फरक नाही)

१४:३७, ३० मे २०१७ ची आवृत्ती

बालचित्रवाणी ही एक राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आहे. हिला भारत सरकारकडून एप्रिल २००३पर्यंत अनुदान मिळत होते. जून १९८४मध्ये मुंबईत स्थापन झालेली ही संस्था १४-११-१९८६ रोजी पुण्यात आली. हिची पुणे विद्यापीठाशी संलग्नता आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ आणि व्हीडिओ सॉफ्टवेअर तयार करणे हे या संस्थेचे कार्य आहे.

बालचित्रवाणीमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी व ऐकण्या-बघण्यासाठी आणि संकलन करण्यासाठी अत्याधुनिक साहित्य आणि सुसज्ज यंत्रणा आहे. ही यंत्रणा व आधुनिक कॅमेरे असल्याने बालचित्रवाणीमधून मुलांसाठी ३० वर्षांमध्ये सहा हजारांहून अधिक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती झाली.

आर्थिक टंचाईमुळे ही संस्था २०१७मध्ये बंद होणार आहे.