Jump to content

"भारताची घटना समिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच द...
(काही फरक नाही)

१६:२१, २० मे २०१७ ची आवृत्ती

भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाच्या राज्यकारभारासाठी घटना समिती नेमण्याचे ठरले. त्याप्रमाणे २८ ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांनी सत्यनारायण सिन्हा यांना बोलावून घेतले आणि घटनेचा मसुदा बनविणार्‍या आगामी समितीच्या सदस्यांच्या नावांचा कागद त्यांच्याकडे सुपूर्द केला. दुसर्‍याच दिवशी घटना समितीच्या बैठकीत गांधीजींचा संदर्भ देऊन सिन्हांनी मसुदा समिती सदस्य म्हणून सात नावांची घोषणा केली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व सर्व सदस्यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुनशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल अणि डी.पी. खेतान या सात नावांना मान्यता दिली. ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची एकमताने निवड झाली. त्यांनी त्याच दिवसापासून मसुदा समितीचे कामकाज सुरू केले.


(अपूर्ण)