"गुरुराज मुतालिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. गुरुराज मुतालिक हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये आधी प... |
(काही फरक नाही)
|
२३:०५, १६ मे २०१७ ची आवृत्ती
डॉ. गुरुराज मुतालिक हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये आधी प्राध्यापक व नंतर अधीक्षक होते. पुढे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असताना त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) निमंत्रण आले आणि ते अमेरिकेत 'डब्ल्यूएचओ'मध्ये संचालकपदी रुजू झाले. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २००९ सालापासून अमेरिकेतच 'माइंड, बॉडी मेडिसीन' (एम्बीएम)चा अभ्यास सुरू केला.
अमेरिकेत एम्बीएम
अमेरिकेत काही वर्षांपासून 'माइंड, बॉडी मेडिसीन' हा परवलीचा शब्द बनला आहे. मोठी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनीही या विषयाला वाहिलेले स्वतंत्र विभाग स्थापन केले आहेत. महर्षी विद्यापीठापासून सुरू झालेला हा प्रवास स्टॅन्फर्ड- हार्वर्डपर्यंत येऊन पोचला आहे. व्यापक संशोधन होत असून, अमेरिकेतील या नवीन विज्ञानाचे चमत्कारिक परिणाम दिसून येऊ लागले आहेत.