"अश्वशक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उं...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
१८ व्या शतकाच्या शेवटी [[जेम्स वॅट]] (१७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९) या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.

पाळीव घोडय़ाच्या शक्तीचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता. त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्याच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले.
पाळीव घोड्याच्या शक्तीचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता; त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्याच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले.

वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात २.४ x २'''π''' x १२ फूट अंतर पार करतो आणि त्यावरून घोडा १८० पाउंडस्-बल (८०० न्यूटन) या शक्तीने वजन ओढू शकतो. यावरून त्याने प्रतिमिनिट ३३,००० फूट-पाउंड्स असे कार्य करणे म्हणजे एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) असे प्रतिपादित केले.
वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात २.४ x २'''π''' x १२ फूट अंतर पार करतो, आणि त्यावरून घोडा १८० पाउंड्‌स-बल (८०० न्यूटन) या शक्तीने वजन ओढू शकतो. यावरून त्याने प्रतिमिनिट ३३,००० फूट-पाउंड्स असे कार्य करणे म्हणजे एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) असे प्रतिपादित केले. अर्थातच घोड्याची जात आणि वय या घटकांमुळे त्यात फरक पडू शकतो, आणि घोडा सर्वकाळ याच शक्तीने कार्य करू शकत नाही, हे उघड आहे. त्याचप्रमाणे यंत्राची आदर्श, निर्धारित आणि प्रत्यक्षात वापरली जाणारी अश्वशक्ती, अशी वेगवेगळी असते. अश्वशक्ती हे एकक पिस्टनयुक्त इंजिन, बॉयलर, विद्युत मोटर, पाणचक्की (टर्बाइन) अशा यंत्रांपासून प्राप्त होणार्‍या शक्तीच्या मोजमापासाठी उपयोगात येते.

==यासंदर्भातील अन्य एकके==

एक यांत्रिकी अश्वशक्ती =५५० फूट-पाउंड्स/सेकंद = ७४५.६९९८७ वॅट्‌स

एक मेट्रिक अश्वशक्ती = ७३५.४९६७५ वॅट्स (७५ किलोग्रॅम वजन एका सेकंदात एक मीटर ओढणे)

एक विद्युत अश्वशक्ती = ७४६ वॅट्‌स

१,००० वॅट्‌स = १ किलोवॅट = १.३४ अश्वशक्ती

[[वर्ग:एकके]]

१६:३५, ४ मे २०१७ ची आवृत्ती

एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती.

१८ व्या शतकाच्या शेवटी जेम्स वॅट (१७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९) या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.

पाळीव घोड्याच्या शक्तीचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता; त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्याच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले.

वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात २.४ x २π x १२ फूट अंतर पार करतो, आणि त्यावरून घोडा १८० पाउंड्‌स-बल (८०० न्यूटन) या शक्तीने वजन ओढू शकतो. यावरून त्याने प्रतिमिनिट ३३,००० फूट-पाउंड्स असे कार्य करणे म्हणजे एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) असे प्रतिपादित केले. अर्थातच घोड्याची जात आणि वय या घटकांमुळे त्यात फरक पडू शकतो, आणि घोडा सर्वकाळ याच शक्तीने कार्य करू शकत नाही, हे उघड आहे. त्याचप्रमाणे यंत्राची आदर्श, निर्धारित आणि प्रत्यक्षात वापरली जाणारी अश्वशक्ती, अशी वेगवेगळी असते. अश्वशक्ती हे एकक पिस्टनयुक्त इंजिन, बॉयलर, विद्युत मोटर, पाणचक्की (टर्बाइन) अशा यंत्रांपासून प्राप्त होणार्‍या शक्तीच्या मोजमापासाठी उपयोगात येते.

यासंदर्भातील अन्य एकके