"अश्वशक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उं...
(काही फरक नाही)

१६:२७, ४ मे २०१७ ची आवृत्ती

एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती.

१८ व्या शतकाच्या शेवटी जेम्स वॅट (१७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९) या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.

पाळीव घोडय़ाच्या शक्तीचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता. त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्याच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले.

वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात २.४ x २π x १२ फूट अंतर पार करतो आणि त्यावरून घोडा १८० पाउंडस्-बल (८०० न्यूटन) या शक्तीने वजन ओढू शकतो. यावरून त्याने प्रतिमिनिट ३३,००० फूट-पाउंड्स असे कार्य करणे म्हणजे एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) असे प्रतिपादित केले.