"वसुधा सरदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वसुधा सरदार या पुणे जिल्ह्य़ातल्या दौंड तालुक्यातील पारगाव येथ... |
(काही फरक नाही)
|
००:४७, ६ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
वसुधा सरदार या पुणे जिल्ह्य़ातल्या दौंड तालुक्यातील पारगाव येथील ‘नवनिर्माण न्यास’च्या कार्यकारी विश्वस्त आहेत. या न्यासामार्फत परिसरातील १० गावांमध्ये ‘मुक्तशाळा’ चालवण्यात येते. १५ गावांमध्ये २०० बचत गटांमार्फत महिला विकासाचे, प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात. दारूमुक्तीसाठी विविध मार्गानी चळवळ उभारणी केली जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ पासून सेंद्रिय शेतीच्या अवलंबासाठी प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. त्यापूर्वीही युक्रांदच्या माध्यमातून, स्त्री चळवळींच्या माध्यमातून वसुधा सरदार यांनी सामाजिक कार्य केले. त्यांच्या शेतीविषय आणि अन्य सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार प्रदान झाले आहेत.
वसुधा सरदार यांना मिळालेले पुरस्कार
- भारत कृषक समाज कृषी पुरस्कार
- किसान रक्षक पुरस्कार
- विवेकरत्न पुरस्कार, वगैरे वगैरे.