"बालाजी तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ |
* आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड (२०१४). |
||
* डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी (जानेवारी २०१७) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
२२:०१, ४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
बालाजी तांबे (जन्म : २८ जून, इ.स. १९४०) हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत.
बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, आणि वडील वासुदेव तांबे शास्त्री यांचा कल अध्यात्माकडे होता.. त्यांनी लहानपणापासूनच बालाजींना आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळविली.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे; भारतीय संस्कृती व वेदविज्ञान यांचा जगभर प्रसार केला आहे.
इ.स. २००३सालापासून बालाजी तांबे यांनी संपादित केलेली ’फॅमिली डॉक्टर’ नावाची पुरवणी पुण्याच्या दैनिक सकाळबरोबर दर शुक्रवारी प्रकाशित होते. ’साम’ नावाच्या मराठी दूरचित्रवाहिनीवर त्यांचे आठवडाभर रोज भगवद्गीता या विषयावर प्रवचन होते.’गीता योग’ या नावाने ही प्रवचने २०११सालापासून सुरू आहेत.
बालाजी तांबे यांनी लिहिलेली पुस्तके
- आत्मरामायण (गुजराती भाषेत)
- आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
- आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी)
- आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
- चक्र सुदर्शन (मराठी)
- मंत्र आरोग्याचा
- मंत्र जीवनाचा
- वातव्याधी
- श्री गीता योग - शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
- श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
- संतुलन क्रियायोग (मराठी)
- स्त्रीआरोग्य
- स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)
- Living Meditation through Om Swarupa (४ भाग)
- Santulan Kriya Yog (SKY)
- Shri Gita Tarot: Shri Krishna Answers Your Question (Set of 61 Divine Cards, इंग्रजी-मराठी)
- The Untold Secrets Of Life
बालाजी तांबे यांच्यावर गुन्हा दाखल
'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकाद्वारे पु्त्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे यांनी २०१५ साली नोव्हेंबरमध्ये अहमदनगर जिल्हा सर्जनकडे पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते. हा विषय आयुर्वेदाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तज्ज्ञांचे मत घेण्यासाठी पाठवण्यात आला. तज्ज्ञांनी बालाजी तांबेंवर पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे. बालाजी तांबे यांचा हेतू पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून लिंगनिवडीबाबतचा आहे हे पुस्तकातून सिद्ध झाले असल्याचे विद्यापीठाच्या समितीने म्हटले आहे. यामुळे पुरुषप्रधानतेचा विचार लोकांमध्ये रुजण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. या पुस्तकाचा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबतच्या जनजागृती मोहिमेवर परिणाम झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. एकूणच या पुस्तकामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.[१][२]
पुत्रप्राप्तीचा प्रचार करुन गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बालाजी तांबे, पुस्तकप्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने संगमनेरच्या कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना तीन वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.
असे असले तरी कोर्टाने बालाजी तांबे यांनी फक्त जुन्या ग्रंथांतील माहिती दिली असल्याचे कारण सांगून कोर्टाने त्यांना या खटल्यातून निर्दोष ठरवले आहे.
पुरस्कार
- आयुर्वेदाच्या प्रसारासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ’रोटरी ग्लोबल लीडरशिप एक्सलन्स’ अवॉर्ड (२०१४).
- डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. ही मानद पदवी (जानेवारी २०१७)
संदर्भ
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/government-registered-a-case-against-balaji-tambe/articleshow/52757656.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.loksatta.com/mumbai-news/government-filed-crime-against-balaji-tambe-1251473/. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |