"मंगलगिरी साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मंगलगिरी हे आंध्र प्रदेशातल्या गुंटुर जिल्ह्यात विजयवाडा आणि ग... |
(काही फरक नाही)
|
१४:१५, ४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
मंगलगिरी हे आंध्र प्रदेशातल्या गुंटुर जिल्ह्यात विजयवाडा आणि गुंटूर या शहरांना जोडणार्या महामार्गावर वसलेले गाव आहे.. या गावात मंगलगिरी या नावाने प्रसिद्ध असलेले कापड आणि साड्या बनतात.
मंगलगिरी गावाचा पूर्वापार चालत आलेला पोटापाण्याचा व्यवसाय म्हणजे हातमागावरचे विणकाम होय. इथे बनलेल्या साड्या आणि ड्रेस मटेरियल नाजूक आणि वेगळे डिझाइन असल्यामुळे सर्वदूर लोकप्रिय आहे. मंगलगिरी साडय़ांना भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र मिळालेले आहे. शुद्ध आणि तलम सुताचा वापर करून विणल्या जाणार्या या साड्या मऊसूत आणि वापरायला आरामदायी असतात. या साडय़ांना ‘निझाम बॉर्डर म्हणून ओळखले जाणारे काठ असतात. ही साडी भारतातील तिन्ही मोसमांत वापरता येते.
मुळातली मंगलगिरी साडी ही शुद्ध टिकाऊ सुती साडी असून साडीच्या अंगात कोणतीही नक्षी विणली जात नाही. पण निझामी काठ मात्र सलगपणे वापरली जाणारी पद्धत आहे. ह्या दोन्ही गोष्टी मंगलगिरी साडीची वैशिष्ट्ये म्हणून ओळखली जातात. हातमागाचे विणकाम आणि ते पण तलम सुताचा वापर करून, त्यामुळे साडीची किंमत मात्र जास्त असते.
मंगलगिरी साडीतील विशेष म्हणजे साडीमध्ये खास आदिवासी डिझाइन विणलेले असते. आणि सुती साडीमध्ये जरी किंवा सोनेरी धाग्याने बारीक चौकडी विणल्या जातात. साडीच्या पदरावर आदिवासी संस्कृतीशी नाते सांगणारे पट्टेदार डिझाइन विणले जाते. त्याकरिता सोनेरी धाग्याने भरतकाम केले जाते. साडीचे रंग मात्र गडद आणि आल्हाददायक असतात. या साड्या विणण्याकरिता आणलेल्या सुताची धुलाई, नंतरची ब्लीचिंगची किंवा रंगाईची व्यवस्थापण गावातच होते. सुमारे ५००० विणकर या कामात गुंतलेले आहेत.
टिकाऊपणा ही या साडीची आणखी एक जमेची बाजू आहे. या साड्या व ड्रेस मटेरियल विणल्यामुळे गावच्या ८०,००० लोकसंख्येपकी निम्म्या लोकांना रोजगार मिळाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे सुती कुडते, दुपट्टे, स्टोल, शबनम पिशव्या इत्यादी उत्पादनेही तयार केली जातात.