Jump to content

"मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन विचाराधीन आहे. या मार्गाच्या ५०८...
(काही फरक नाही)

०७:४९, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन विचाराधीन आहे. या मार्गाच्या ५०८ किलोमीटर प्रवापैकी सव्वाशे किलोमीटरचा हिस्सा महाराष्ट्रात आहे आणि बारापकी चार स्थानके (बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स- मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर) महाराष्ट्रात आहेत. उरलेली आठ - वापी, बिलिमोरा, सुरत, भडोच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती - ही गुजराथेत आहेत.

बुलेट ट्रेनचा कमाल वेग प्रतितास ३५० किलोमीटर असेल. ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत पूर्ण करेल. पण सर्व बारा स्थानकांवर थांबल्यास २ तास ५८ मिनिटे लागतील.

बुलेट ट्रेनच्या बांधणीचा एकूण खर्च ९७,६३६ कोटी रूपये आहे. त्यापकी जपान सरकारच्या ’जायका’ या संस्थेकडून ७९,१६५ कोटींचे कर्ज मिळेल. व्याजदर फक्त ०.१ टक्के. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांनी परतफेड चालू होईल आणि ती ३५ वर्षे चालेल. थोडक्यात परतफेडीचा कालावधी पन्नास वर्षांचा आहे. इ.स. २०२३-२४ पर्यंत बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य केल्यास २०४० सालापासून परतफेड चालू होईल आणि तेव्हा मासिक हप्‍ता सुमारे दोनशे कोटी रुपये असेल.

जापानने दिलेल्या कर्जाव्यतिरिक्त लागणार्‍या उरलेल्या रकमेपकी (१८,४७१ कोटी रूपये) भारताचे केंद्र सरकार निम्मा हिस्सा उचलेल आणि महाराष्ट्र व गुजरातला प्रत्येकी पंचवीस टक्के भार सोसावा लागेल. त्यानुसार महाराष्ट्राला साडेचार हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम या प्रकल्पाला द्यावी लागेल.

पुणे-नाशिक-नागपूर वगैरे

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात कोणताही बदल प्रस्तावित नाही. त्यामुळे ती मुंबईऐवजी पुण्यापासून चालू होण्याचा आणि नाशिकमार्गे अहमदाबादला नेण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र, मुंबई- नाशिक- नागपूर या मार्गावर अतिवेगवान कॉरिडॉर (हायस्पीड कॉरिडॉर) करण्याबाबत अभ्यास चालू असल्याचेही रेल्वेने नमूद केले.