"श्याम जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्याम जोशी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘ग्रंथासखा’ नावाची...
(काही फरक नाही)

२३:३५, १८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

श्याम जोशी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘ग्रंथासखा’ नावाची लायब्ररी चालवतात. आधी चित्रकला शिक्षक असलेल्या जोशींनी निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे, मराठी भाषेचे वैभव असणारे दुर्मीळ आणि अमूल्य अक्षर वाङ्मय मिळवून त्यांच्या ग्रंथसखा’ नावाच्या लायब्ररीत संकलित केले आहे.

ग्रंथसंग्रह

वडिलांच्या निधनानंतर ‘निसर्ग ट्रस्ट’ स्थापन करून त्यांच्या संग्रही असलेली दहा हजार पुस्तके श्याम जोशी यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिली. ग्रंथालयाच्या जागेसाठी त्यांनी त्यांचा राहता बंगलाही विकला. त्यानंतर अक्षरश: बृहन्महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी ठिकठिकाणी विखुरलेले मौल्यवान अक्षरधन मिळवले. सध्या त्यांच्या ‘ग्रंथसखा’मध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक पुस्तके असून त्यापैकी निम्म्याहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे.

श्याम जोशी हे महाराष्ट्रातील २५हून अधिक मोठ्या रद्दी दुकानदारांच्या ते संपर्कात आहेत. मराठी भाषेतील अनेक अमूल्य अक्षरलेणी त्यांना या रद्दीच्या दुकानांतून मिळाली.

बदलापूर परिसरातील पाच हजारांहून अधिक वाचक ‘ग्रंथसखा’चे सभासद आहेत. श्याम जोशी यांनी ब्रिटिश राजवटीत छापण्यात आलेल्या दोलामुद्रित शंभर ग्रंथांसह अभ्यासकांना उपयोगी पडतील अशा एक लाखांहून अधिक संदर्भग्रंथांचे स्वतंत्र दालन ‘मराठी, भाषा, इतिहास, संस्कृती संशोधन केंद्र’ या नावाने अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे.