"पीयूची वही" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ‘संगीत पीयूची वही’ नावाचे डॉ. संगीता बर्वे यांनी लिहिलेले बालन... |
(काही फरक नाही)
|
१४:२३, १३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
‘संगीत पीयूची वही’ नावाचे डॉ. संगीता बर्वे यांनी लिहिलेले बालनाट्य आहे. ते नाटक त्यांच्याच पीयूची वही नावाच्या पुस्तकाचे त्यांनीच केलेले नाट्यरूपांतर आहे.
पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगावायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो. निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने ती आपले अनुभव लिहू लागते, अशी ही रोजनिशी आहे.
रोजनिशी लिहिण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे या प्रेरणेतून ती निसर्गाच्या जवळ जाते. निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींची पीयूला कशी ओळख होते, पर्यावरणाबद्दल कशी आपुलकी निर्माण होते याचे प्रभावी सादरीकरण ‘संगीत पीयूची वही’ या बालनाटकातून उलगडत जाते.
‘संगीत पीयूची वही’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात रेवा चित्राव हिने पीयूची भूमिका केली आहे. चैत्रा आपटे, सुहानी धडफळे, प्रणव बाम, पूर्वा बाम, शर्व वढवेकर हे तिचे सवंगडी बनले होते.. भालचंद्र करंदीकरांनी आजोबांचे आणि प्रतिभा भगत यांनी मावशींचे काम केले होते. या नाटकात डॉ. संगीता बर्वे यांनी लिहिलेली पाच गाणी असून ती प्रांजली बर्वे हिने गायली आहेत. गाण्यांसाठी डॉ. नीरज करंदीकर, डॉ. आशुतोष जावडेकर, प्रियंका बर्वे आणि राजीव बर्वे यांनी संगीत दिले आहे. नाटकाचे दिग्दर्शन अमृत सामक यांचे होते.