"मीना वैशंपायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मीना वैशंपायन या एक मराठी लेखिका आहेत. मीना वैशंपायन यांनी सं... |
(काही फरक नाही)
|
२१:५७, ८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
डॉ. मीना वैशंपायन या एक मराठी लेखिका आहेत.
मीना वैशंपायन यांनी संस्कृतात आणि मराठीत एम.ए. केले असून मराठी साहित्य हा विषय घेऊन पीएच.डी मिळवली आहे. त्यांनी चरित्रलेखन, ललित, समीक्षा यांबरोबरच अनेक अनुवादही केले आहेत. डॉ. मीना वैशंपायन या मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या मानद उपाध्यक्ष आहेत. (इ.स. २०१६)
डॉ. मीना वैशंपायन यांनी लिहिलेली पुस्तके
- अनित्य (अनुवादित; मूळ हिंदी कादंबरी : लेखिका – मृदुला गर्ग),
- मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या संग्रही असलेल्या हस्तलिखितांची माहिती देणारा सूचिग्रंथ (संकलक - डॉ. मीना वैशंपायन)
- ज्ञानकोशकार डॉ. केतकर
- ‘ती’चं अवकाश - रूढी-परंपरांची चौकट मोडून स्वतःचं क्षितिज शोधणार्या तीन पिढ्या (अनुवादित; मूळ इंग्रजी - ए स्पेस ऑफ हर ओन' , मूळ संपादक : लीला गुलाटी आणि जसोधरा बागची)
- दुर्गापर्व (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा समीक्षेसाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे.)
- दुर्गा भागवत संच - दुर्गु आजीच्या गोष्टी (संपादित)
- साहित्यवेध