"ह्युस्टन स्मिथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २१: | ओळ २१: | ||
हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी बरेच माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले. |
हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी बरेच माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले. |
||
==सन्मान आणि पुरस्कार== |
|||
* ह्युस्टन स्मिथ यांच्या धर्मविषयक माहितीपटांना आंंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. |
|||
* १९९६ मध्ये बिल मॉयर्स यांनी स्मिथ यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट बनवला. |
|||
* परस्पर सामंजस्य, सामाजिक न्याय आणि शांततेसाठी जगभरातील धर्म एकत्र यावेत यासाठी आयुष्यभर निष्ठेने आणि तळमळीने कार्य करीत राहिल्याबद्दल मॅसेच्युसेट्स येथे स्मिथ यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. |
|||
१६:१८, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
प्रा. ह्युस्टन कमिंग्ज स्मिथ (जन्म : चीन, ३१ मे, इ.स. १९१९; मृत्यू : बर्कले-कॅलिफोर्निया (अमेरिका), ३१ डिसेंबर, २०१६) हे विविध धर्मग्रंथांचा आणि धर्मशास्त्राचा आयुष्यभर आणि अफाट व्यासंग करणारे एक विद्वान होते.
शिक्षण आणि अध्यापन
१७ वर्षे चीनमध्ये राहिल्यानंतर ह्युस्टन स्मिथ शिक्षणासाठी अमेरिकेत आले. शिकागो विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. नंतर त्यांनी स्वामी सत्प्रकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू वेदान्ताचा, बौद्ध धर्माचा आणि सूफी इस्लामचा अभ्यास केला. त्यानंतर स्मिथ यांनी १९४४ ते ४९ या कालावधीत डेन्व्हर विद्यापीठात धर्मशास्त्राचे अध्यापन केले. तेथून ते वॉशिंग्टन विद्यापीठात गेले. तेथे दहा वर्षे शिकवण्याचे काम केल्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रा. टिमोथी लेरी आणि रिचर्ड अल्पर्ट यांनी मानवी मनाचा शोध घेण्यासाठी जे नानाविध प्रयोग केले त्यात प्रा. स्मिथ यांचाही सहभाग होता. येथून कॅलिफोर्निया, बर्कले आदी विद्यापीठांतून त्यांनी धर्मशास्त्र आणि त्याचे महत्त्व या विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भारताली दिलेली भेट
प्रा. स्मिथ १९६४ मध्ये प्रथम भारतात आले होते. त्या वेळी ते एका तिबेटी बौद्ध मठात राहत होते. बौद्ध भिख्खू जो जप करत होते त्याचे ध्वनिमुद्रण त्यांनी करून घेतले. तेथून मायदेशी परतल्यानंतर ते ध्वनिमुद्रण एमआयटीतील आपल्या विद्यार्थ्यांना दिले व त्याचे विश्लेषण करण्याची सूचना त्यांनी केली. त्यातून त्यांनी एका आगळ्यावेगळ्या संगीत शैलीचा शोध लावला.
ह्युस्टम स्मिथ यांची हिंदू धर्माविषयी धारणा
‘भगवद्गीतेला अनुसरणारे हिंदू हे कर्मसिद्धान्त मानणारे असल्यानेच ते वैराग्यमार्गाकडे वळत नाहीत. रोजच्या जगण्यातूनच त्यांना कर्माचे मर्म अधिक सखोलपणे कळते’ अशा सुलभ-सोप्या शब्दांत हिंदू धर्मग्रंथांविषयीचे मत त्यांनी व्हक्त केले आहे.
पुस्तके
- ह्युस्टन स्मिथ यांंच्या ‘द वर्ल्ड्स रिलिजन्स’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाच्या २० लाख प्रती खपल्या होत्या.
प्रा. ह्युस्टन स्मिथ यांनी बनविलेले माहितीपट
वॉशिंग्टन विद्यापीठात असतानाच त्यांनी दूरचित्रवाणीसाठी ‘रिलिजन्स ऑफ मॅन्स’ आणि ‘सर्च फॉर अमेरिका’ या दोन मालिका तयार केल्या. या दोन्ही मालिकांची अभ्यासकांनी खूप प्रशंसा केली होती.
त्यामुळे मग त्यांना आर्थर क्रॉम्टन यांच्यासमवेत ‘सायन्स अॅण्ड ह्य़ूमन रिस्पॉन्सिबिलिटी’ या अन्य एका चित्रवाणी मालिकेची निर्मिती करण्याची संधी मिळाली.
हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी बरेच माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले.
सन्मान आणि पुरस्कार
- ह्युस्टन स्मिथ यांच्या धर्मविषयक माहितीपटांना आंंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
- १९९६ मध्ये बिल मॉयर्स यांनी स्मिथ यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट बनवला.
- परस्पर सामंजस्य, सामाजिक न्याय आणि शांततेसाठी जगभरातील धर्म एकत्र यावेत यासाठी आयुष्यभर निष्ठेने आणि तळमळीने कार्य करीत राहिल्याबद्दल मॅसेच्युसेट्स येथे स्मिथ यांना मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.