"अनिल धस्माना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: अनिल धस्माना हे डिसेंबर २०१६मध्ये भारत सरकारच्या ‘रॉ’ म्हणजे ‘र... |
(काही फरक नाही)
|
१४:२७, २० डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
अनिल धस्माना हे डिसेंबर २०१६मध्ये भारत सरकारच्या ‘रॉ’ म्हणजे ‘रिसर्च अॅन्ड अॅनॅलिसिस विंग’ या केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख झाले आहेत.
धस्माना हे मूळचे उत्तराखंड राज्यातील असून १९८१च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली नियुक्ती इंदूरमध्ये सुपरिन्टेडेन्ट ऑफ पोलिस (एसपी) या पदावर झाली. १९८१च्या दशकात इंदूरमध्ये माफिया गुंडांनी थैमान घातले होते आणि सट्टा तसेच जुगार यांना ऊत आला होता. नेमक्या त्याच काळात या शहरात अनिल धस्माना आले.त्यांनी हे ‘माफियाराज’ संपुष्टात आणण्यासाठी ‘ऑपरेशन बॉम्बे बाजार’ या नावाने धाडसी मोहीम हाती घेतली. त्यांच्या या कारवाईनंतर इंदूरमध्ये अनेक दिवस संचारबंदी जारी होती. ‘एसपी’च्या त्या तडफेने आणि जिद्दीने माफियाराज संपुष्टात आले.
धस्माना यांच्या त्या कामगिरीनंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. आतापावेतो त्यांनी ‘रॉ’मध्ये २३ वर्षे विविध पदांवर काम केले आहे. ‘रॉ’ मधील लंडन-फॅंकफुर्ट तसेच युरोप आणि सार्क या विभागांची जबाबदारी त्यांनी प्रदीर्घ काळ सांभाळली आहे.
धस्माना हे अफगाणिस्तान, बलुचिस्तान तसेच इस्लामिक प्रश्न आणि दहशतवादी कारवाया यासंबंधातील तज्ज्ञ मानले जातात. पाकिस्तान रोजच्या रोज भारताच्या कुरापती काढत असताना आणि अफगाणिस्तानातली अस्थिरताही चिंताजनक असताना धस्मान ‘रॉ’चे प्रमुख झाले आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१६ या भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळेच अफगाणिस्तानसंबंधातील प्रश्नांची जाण असलेले धस्माना यांची ही नियुक्ती हा निव्वळ योगायोग नसावा. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे धस्माना हे केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या खास विश्वासातील समजले जातात. त्यामुळेच त्यांची ही नियुक्ती डोवाल यांनीच घडवून आणली, असेही सांगितले जाते.