"नागदिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नागदिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला असते. या दिवशी नागप्रतिमे... |
(काही फरक नाही)
|
२३:४३, १७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
नागदिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला असते. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्यांतील प्रत्येकाच्या नावाने एकेक पक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा यात हेतू असतो.
स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे
शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे या च पंचमी ।
स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥
या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने व एकभुक्त व्रत केल्याने फलप्राप्ती होते.