"वि.ह. वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. वि.ह. वझे (निधन : डिसेंबर, २०१६) हे कोल्हापुरात राहणारे, एक सामाज... |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* १९७३ ते १९७५ या काळात डॉ. वि.ह. वझे हे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते. |
|||
⚫ | |||
* डॉ. वि.ह वझे हे कोल्हापुरातील न्यू एजुकेशन सोसायटीच्या सी.जी.कुलकर्णी वाङ्मय मंडळाचे २०१६ सालपर्यंत अध्यक्ष होते |
|||
⚫ | * वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची नोंद घेऊन कोल्हापूर महापालिकेने डॉ. वि.ह. वझे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या कार्याची नोंद इंटरनॅशनल टॅलेंट्स ऑफ इंडिया संस्थेने घेतली होती. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. |
||
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]] |
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]] |
१५:३१, १७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
डॉ. वि.ह. वझे (निधन : डिसेंबर, २०१६) हे कोल्हापुरात राहणारे, एक सामाजिक बांधिलकी जपणारे आणि एकाचवेळी आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांत काम करणारे सर्जन-डॉक्टर होते.
डॉ. वझे हे मूळचे औरंगाबादचे. त्यांनी मुंबई वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वाधिक गुण मिळवत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले, आरोग्यसेवेसाठी कोल्हापूरची निवड केली आणि ते कायमचेच कोल्हापूरकर झाले.
वझे यांनी कोल्हापूरच्या अंबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सुरू केली. केवळ नाडी परीक्षेद्वारे रोगाचे अचूक निदान करून अल्प मोबदल्यात रुग्णांवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा होता. वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात मानद सर्जन म्हणूनही असंख्य रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यामुळेच गरिबांचा डॉक्टर अशी त्यांची ओळख निर्माण झाली. भारत-पाक, चीन युद्धात जखमी झालेल्या कोल्हापूर परिसरातील वीर जवानांवर मोफत उपचार करून त्यांनी राष्ट्रप्रेमाची प्रचीती दिलीच शिवाय जवानांच्या कुटुंबीयांतील सदस्यांची मोफत वैद्यकीय सेवाही केली. या प्रवासात त्यांची धर्मपत्नी मीनाताई वझे यांनी त्यांना मोलाची साथ दिली
भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, गुजराल, देवगौडा, वाजपेयी, नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांच्यावर मानद सर्जन म्हणून डॉ. वझे यांनी वैद्यकीय उपचार केले.
कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही डॉ. वझेंची तळमळीची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हे स्वप्न साकारले.
अभिजात शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, साहित्यिक चळवळ हे डॉ. वझे यांचे अत्यंत आवडीचे विषय होते. वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना वेळोवेळी यथाशक्ती आर्थिक मदत केली. म्हणून तर सेवाभावी डॉक्टर म्हणून त्यांचा सतत अभिमानाने उल्लेख व्हायचा.
पुरस्कार आणि सन्मान
- १९७३ ते १९७५ या काळात डॉ. वि.ह. वझे हे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते.
- डॉ. वि.ह वझे हे कोल्हापुरातील न्यू एजुकेशन सोसायटीच्या सी.जी.कुलकर्णी वाङ्मय मंडळाचे २०१६ सालपर्यंत अध्यक्ष होते
- वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची नोंद घेऊन कोल्हापूर महापालिकेने डॉ. वि.ह. वझे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या कार्याची नोंद इंटरनॅशनल टॅलेंट्स ऑफ इंडिया संस्थेने घेतली होती. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.