"सुब्बलक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी ऊर्फ एम.एस. सुब्बलक्ष्मी (तमिळ:... |
(काही फरक नाही)
|
१५:५८, ९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी ऊर्फ एम.एस. सुब्बलक्ष्मी (तमिळ: மதுரை சண்முகவடிவு சுப்புலட்சுமி ; रोमन लिपी: M. S. Subbulakshmi) (१६ सप्टेंबर, इ.स. १९१६ - ११ डिसेंबर, इ.स. २००४) या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या, भारतरत्न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका होत्या.
सुब्बलक्ष्मी यांना त्यांच्या वीणावादक आईकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. चेन्नई येथील सभेत गाऊन सतरा वर्षे वयाच्या सुब्बलक्ष्मींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.गायिकाम्हणून नावलौकिक मिळवताना त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटांतही कारकीर्द केली. सेवासदनम, सावित्री, शाकुंतलम, या तमिळ आणि मीरा (तमिळ व हिंदी) या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचे आणि गायकीचे दर्शन प्रेक्षकांना घडले. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.
सुब्बलक्ष्मी यांच्यावर व्ही राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला एक लघुपट आहे.
सुब्बलक्ष्मी यांनी गायलेली काही प्रसिद्ध हिंदी/संस्कृत गीते
- चाकर राखो जी (हिंदी)
- पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे
- भज गोविंदम
- मधुराक्षतम्
- मोरे आँगना में (हिंदी)
- मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी)
- श्रीवेंकटेश सुप्रभातम्
- विष्णुसहस्रनाम
- वृंदावन कुंज भवन (हिंदी)
- हनुमान चालिसा
- हरि तुम हरो (हिंदी)
सुब्बलक्ष्मी यांना आयुष्यभरात अनेक पुरस्कार लाभले, त्यांतले काही हे :-
पुरस्कार
- पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- संगीत कलानिधी आणि संगीत कलाशिखरमणी पुरस्कार
- कालिदास सन्मान
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार