Jump to content

"साबण्णा बुरूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: साबण्णा भीमण्णा बुरूड हे पुण्यातील वाद्यांची दुरुस्ती करणारे ए...
(काही फरक नाही)

२३:२९, ४ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

साबण्णा भीमण्णा बुरूड हे पुण्यातील वाद्यांची दुरुस्ती करणारे एक कारागीर आहेत. संगीत तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले असताना कोणत्याही यंत्राची मदत न घेताते वाद्यांची हातानेच दुरुस्ती करतात. हार्मोनिअमपासून ऑर्गन, पायपेटी व सर्व तंतुवाद्यांची दुरुस्ती आणि नव्या कोर्‍या बाजाच्या पेटीची निर्मिती यांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

सबण्णांना लहानपणी संगीत आवडत नव्हते. नंतरच्या काळात हिंदी चित्रपट संगीत भावू लागले. पुढे आपसूकच ते या क्षेत्राकडे ओढले गेले. २०१६ साली ७५ वर्षांचे झालेले साबण्णा इ.स. १९५६पासून वाद्यदुरुस्तीच्या व्यवसायात आहेत.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील बेळगेरी हे त्यांचे गाव. घरात बुरूड व्यवसाय. चार भावंडांमध्ये सर्वांत मोठे असल्याने कुटुंबाची जबाबदारी साबण्णा यांच्यावर आली. एका हार्मोनियम व्यावसायिकाबरोबर त्यांनी पुणे गाठले. वाद्यांची दुरुस्ती शिकत शिकत ते पुण्यात वाद्यांची विक्री करणार्‍या मिरजकरांच्या दुकानात काम करू लागले. पुढे याच कारणासाठी त्यांनी मुंबई गाठली, प्रसंगी मिळेल ते खाऊन व रस्त्यावर मुक्काम करून दिवस काढले. कलेत पारंगत झाल्यानंतर ते पुन्हा पुण्याला आले. एच. व्ही. मेहेंदळे यांच्या दुकानात काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी वडारवाडीतील आपल्या घरातच वाद्यदुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला.

पुण्यातील बहुतेक सर्व संगीत कलावंत साबण्णा यांच्याकडूनच आपल्या वाद्यांची दुरूस्ती करून घेतात.

पुरस्कार

अभिजात संगीताच्या प्रसारार्थ कार्यरत असलेल्या गानवर्धन संस्थेतर्फे वाद्यदुरुस्ती करणार्‍या साबण्णा भीमण्णा बुरूड यांना वाद्य कारागीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (१-१२-२०१६)