"भारतातील श्रीमंत मंदिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारतातील अनेक मंदिरांकडे अमाप सपत्ती आहे, आणि यांतील अनेकांची स... |
(काही फरक नाही)
|
२२:१९, २२ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
भारतातील अनेक मंदिरांकडे अमाप सपत्ती आहे, आणि यांतील अनेकांची संपत्ती दिवसागणिक वाढतच असते. अशा काही मंदिरांची ही यादी :-
- पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ : हे भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात श्रीमंत हिंदू मंदिर मानले जाते. केरळमध्ये असलेल्या या मंदिराकडे जवळपास वीस बिलियन डॉलर म्हणजे १ लाख ३६ हजार कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
- तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेशमध्ये असणारे तिरुपती बालाजी मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. फक्त लाडूंचा प्रसाद विकूनच या मंदिराला ७५ कोटींहून अधिक उत्पन्न मिळते तर वर्षाला ६०० कोटींहून अधिक रकमेची देणगी या मंदिराकडे येते.
- शिर्डी साई बाबा मंदिर, महाराष्ट्र : भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीत शिर्डी देवस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मंदिराला वर्षाला ३६० कोटींच्या आसपास देगणी येते.
- वैष्णोदेवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर : सर्वाधिक भेट देणाऱ्या या मंदिरांच्या यादीत वैष्णोदेवीचे मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर येते. दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला येतात. यातून मंदिराला ५०० कोटींचा नफा मिळतो.
- सिद्धिविनायक मंदिर, महाराष्ट्र : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर या यादीत पाचव्या क्रमांकावर असून या मंदिराकडे ४८ ते १२५ कोटींच्या आसपास संपत्ती आहे.