Jump to content

"वसंत पळशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वसंत पळशीकर (जन्म :१९३६; मृत्यू : नाशिक, २९ आॅक्टॊबर, २०१६) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक- राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. नवभारत’ आणि समाज प्रबोधन पत्रिका या मासिकाचे ते संपादक होते. पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री- पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते.

पळशीकर यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता. सन १९५९मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यात त्यांनी वेळोवेळी कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली होती. संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, दुसऱ्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला.

वसंत पळशीकर यांच्या कार्याची माहिती देणारा एक लघुपटही आहे.

==वसंत पळशीकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==वसंत पळशीकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* चौकटी बाहेरचे चिंतन
* जमातवाद, राष्ट्र, धर्म आणि धर्मनिरपेक्षता

* जिहाद गुलाल आणि सारीपाट
* जिहाद गुलाल आणि सारीपाट
* धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा
* परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा
* पारंपारिक आणि आधुनिक शेती
* Role and Training of Development Activists.(सहलेखिका : कमला भसीन, लक्षी राव)

१८:४४, २९ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

वसंत पळशीकर (जन्म :१९३६; मृत्यू : नाशिक, २९ आॅक्टॊबर, २०१६) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक- राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. नवभारत’ आणि समाज प्रबोधन पत्रिका या मासिकाचे ते संपादक होते. पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री- पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते.

पळशीकर यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता. सन १९५९मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यात त्यांनी वेळोवेळी कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली होती. संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, दुसऱ्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला.

वसंत पळशीकर यांच्या कार्याची माहिती देणारा एक लघुपटही आहे.

वसंत पळशीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • चौकटी बाहेरचे चिंतन
  • जमातवाद, राष्ट्र, धर्म आणि धर्मनिरपेक्षता
  • जिहाद गुलाल आणि सारीपाट
  • धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा
  • परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा
  • पारंपारिक आणि आधुनिक शेती
  • Role and Training of Development Activists.(सहलेखिका : कमला भसीन, लक्षी राव)

वसंत पळशीकर यांच्याविषयीची पुस्तके

  • उमगत असणारे वसंत पळशीकर (लेखिका - डाॅ.मेदिनी डिंगरे)

वसंत पळशीकर यांना मिळालेले पुरस्कार