Jump to content

"दाऊद दळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्राचार्य डॉ. दाऊद दळवी (जन्म : ठाणे-मराराष्ट्र, २० जानेवारी, इ.स. १९...
(काही फरक नाही)

०६:४६, २२ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

प्राचार्य डॉ. दाऊद दळवी (जन्म : ठाणे-मराराष्ट्र, २० जानेवारी, इ.स. १९३७; मृत्यू : ठाणे, ३१ ऑगस्ट, इ.स. २०१६) हे एक इतिहासाचे अभ्यासक होते. इ.स. १९६५ ते १९८६ मुंबई विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. १९८६ ते १९९८ या काळात ते ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते.

शाळेत असल्यापासूनच दाऊदसरांना इतिहासविश्वाची ओढ वाटे, या विषयाची उत्सुकता आणि कुतूहलामागे धावण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते इतिहासाचे आदर्श अध्यापक झाले. बंदिस्त वर्गापेक्षा दर्‍याखोर्‍या, किल्ले, लेण्या येथे ते अधिक रमत. पुस्तकांपेक्षा इतिहास जगण्याची त्यांची शिकवण आजही विद्यार्थी जपत आहेत. काहीसा रटाळ वाटणारा इतिहास खुमसदार शैलीत मांडून विद्यार्थ्यांना वर्गात खिळवून ठेवणारे आणि लेखणीतून वाचकांना महाराष्ट्राच्या इतिहासविश्वाची सफर घडविणारे ते प्राध्यापक होते.

संस्थाकीय काम

  • डॉ. दाऊद दळवी हे मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळ विधिसभेचे सदस्य होते.
  • ठाणे शिक्षण मंडळाच्या आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते.
  • ठाणे मराठी ग्रंथसंग्रहायलयाचे विश्वस्त होते.
  • समर्थ भारत व्यासपीठाचे अध्यक्ष होते.
  • ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते.
  • दाऊद दळवी हे मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेचे काम सांभाळत.
  • राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज, इंडियन हिस्टरी अँड कल्चर सोसायटी, राष्ट्रीय एकात्मता समिती असे राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी काम केले.

डॉ. दाऊद दळवी यांनी लिहिलेली पुस्तके

  • असे घडले ठाणे
  • ऑन द स्लोप ऑफ सह्यद्री
  • माझे अंतरंग
  • मुस्लिम स्तापत्य
  • लेणी महाराष्ट्राची