"धनंजय थोरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: धनंजय थोरात हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे युवक काँग्रेसचे अ... |
(काही फरक नाही)
|
१२:३९, ३ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
धनंजय थोरात हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील स.ग. थोरात हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. धनंजयच्या आई प्राथमिक शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.
धनंजयचे शिक्षण पुण्याच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामात सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली. निवडणुकांदरम्यान स्लिपा लिहिणे, त्या घरोघरी वाटणे, पक्षाची पत्रके वाटणे, सभेची तयारी करणे आदी किरकोळ कामांमध्ये धनंजयने स्वतःला झोकून दिले होते.
पुढे त्याच्या कामाचा धडाका असाच चालू राहिला आणि पुण्यात युवक काँग्रेस ही चळवळ सक्रिय झाली आणि एके दिवशी धनंजय पुणे शहर युवा काँग्रेसचा अध्यक्ष झाला. त्यानंतर त्याने पुण्यातील तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवला. काँग्रेसचे तत्कालीन पुढारी जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगीळ, बाळासाहेब भारदे बॅ. अ.र. अंतुले, विलासराव देशमुख, सीताराम केसरी यांच्याही तो परिचयाचा झाला. त्याचा फायदा असा झाला की त्याला पुणे महापालिकेच्या गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक या मतदार संघातून महापालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळाले. जनसंपर्क आणि प्रभावी प्रचार यामुळे ही अटीतटीचे लढत त्याने जिंकली आणि धनंजय थोरात पुण्याचे नगरसेवक झाले. पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले. तेथेही त्यांनी तडफदारपणे काम केले.
पुढच्या निवडणुकीच्या वेळी धनंजयचा मतदारसंघ बदलला गेला. येथे तो एका कुप्रसिद्ध स्थानिक कुप्रसिद्ध गुंडाबरोबर निवडणूक लढला आणि पडला. तेव्हा त्याला पुण्याच्या आर.टी.ओ. कमिटीचा सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली. तेथेही त्याने निःस्वार्थीपणे काम केले.