"शरद राव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: शरद राव (मृत्यू : मुंबई, १ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे मुंबईत महापालिका, ब... |
(काही फरक नाही)
|
००:२५, २ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
शरद राव (मृत्यू : मुंबई, १ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे मुंबईत महापालिका, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा आदी क्षेत्रात काम करणारे कामगार नेते होते.
मुंबईत ‘बेस्ट’मध्ये नोकरी करताना शरद राव यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देशातील कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या संपर्कात आल्यावर शरद राव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मुंबई हे कार्यक्षेत्र ठरवून शरद राव यांनी तेथील विविध क्षेत्रात काम करणार्या कामगारांना संघटित करण्याचे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी गोरेगाव येथून विधानसभेची अयशस्वी निवडणूकही लढविली होती.
एक काळ असा होता, की राव यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के युनियन्स होत्या. राव यांनी या माध्यमातून अनेक लढे दिले, बंद आणि संपही पुकारले. म्हणून त्यांना बंदसम्राट म्हणत.
शरद राव हे मृत्युसमयी ७५ वर्षांचे होते.