"मीना तुपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मीना भीमसिंग तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्य़... |
(काही फरक नाही)
|
१५:००, २१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
मीना भीमसिंग तुपे या या एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुरा या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिच्या वडलांनी मीना तुपे यांना शिकायला प्रोत्साहित केले, तर आईचा, शशिकला तुपे यांचा विरोध होता.
चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणार्या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा असून बहिणींमध्ये मीना सर्वात लहान आहे. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठय़ा तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. परंतु, मीनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. तिच्या वडलांनी मीना तुपे यांना आईचा, शशिकला तुपे यांचा विरोध डावलून शिकायला प्रोत्साहित केले. . मीनाला लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागली. शिक्षिका होण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. मात्र, शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीची आशा धूसर वाटत होती. याच काळात पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिचा निर्णय बदलला. ती हवालदार झाली. खंडाळा प्रशिक्षण केंद्रात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिक मिळवले. पण या पदावर तिचे मन रमेना. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत ती महिलांमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.