"न.गो. राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. न.गो. राजूरकर हे हैदराबादचे ख्यातनाम राजकारणप्रेमी लेखक व वक्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

राजूरकरांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत. इंग्रजीतील ग्रंथात त्यांनी [[पंडित नेहरू|नेहरूंचे]] राजकारण, भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी, गांधी व [[पंडित नेहरू|नेहरूंचे]] तुलनात्मक जीवनविषयक तत्त्वज्ञान, गांधीजींचे राजकीय नेता व विचारवंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व, [[पंडित नेहरू|नेहरूंच]]े स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कार्य, भारताची धर्मनिरपेक्षता आदी विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यांनी [[पंडित नेहरू|पंडित नेहरूंशी]] अनेक वेळा चर्चा करून त्यांचे राजकारण समजून घेतले व त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे.

राजूरकरांनी १९९१साली लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे विश्लेषण करणारी व्याख्याने दिली होती.

==पुस्तके==
* अंजली
* पंडित नेहरू : एक मागोवा (सहलेखक - [[नरहर कुरुंदकर]])
* प्रतिबिंब
* प्रकाशचित्रे (व्यक्तिचित्रे संग्रह)
* विचारयात्रा
* वेगळी माणसं.. वेगळ्या वाटा

==पुरस्कार==
* नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे डॉ. न.गो. राजूरकरांना त्यांच्या ग्रंथसेवेचा गौर्व करणारा वाङ्‌मय पुरस्कार प्रदान झाला. (२६-२-२०११)

१४:२२, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

डॉ. न.गो. राजूरकर हे हैदराबादचे ख्यातनाम राजकारणप्रेमी लेखक व वक्ते आहेत. त्यांचे शिक्षण तिथल्याच निजाम कॉलेजातून आणि विधि महाविद्यालयातून झाले. राजूरकरांनी उस्मानिया विद्यापीठात जवळजवळ तीन दशके राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि शाखाप्रमुख म्हणून काम केले आहे. शाळा व कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले आहे. त्यांचे उर्दू भाषेवरही प्रभुत्व आह. त्या भाषेत त्यांनी कविता व नाटके लिहिली आहेत.

राजूरकरांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत. इंग्रजीतील ग्रंथात त्यांनी नेहरूंचे राजकारण, भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी, गांधी व नेहरूंचे तुलनात्मक जीवनविषयक तत्त्वज्ञान, गांधीजींचे राजकीय नेता व विचारवंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व, नेहरूंचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कार्य, भारताची धर्मनिरपेक्षता आदी विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यांनी पंडित नेहरूंशी अनेक वेळा चर्चा करून त्यांचे राजकारण समजून घेतले व त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे.

राजूरकरांनी १९९१साली लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे विश्लेषण करणारी व्याख्याने दिली होती.

पुस्तके

  • अंजली
  • पंडित नेहरू : एक मागोवा (सहलेखक - नरहर कुरुंदकर)
  • प्रतिबिंब
  • प्रकाशचित्रे (व्यक्तिचित्रे संग्रह)
  • विचारयात्रा
  • वेगळी माणसं.. वेगळ्या वाटा

पुरस्कार

  • नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे डॉ. न.गो. राजूरकरांना त्यांच्या ग्रंथसेवेचा गौर्व करणारा वाङ्‌मय पुरस्कार प्रदान झाला. (२६-२-२०११)