"न.गो. राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. न.गो. राजूरकर हे हैदराबादचे ख्यातनाम राजकारणप्रेमी लेखक व वक्... |
(काही फरक नाही)
|
१४:२१, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
डॉ. न.गो. राजूरकर हे हैदराबादचे ख्यातनाम राजकारणप्रेमी लेखक व वक्ते आहेत. त्यांचे शिक्षण तिथल्याच निजाम कॉलेजातून आणि विधि महाविद्यालयातून झाले. राजूरकरांनी उस्मानिया विद्यापीठात जवळजवळ तीन दशके राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि शाखाप्रमुख म्हणून काम केले आहे. शाळा व कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी चळवळींचे नेतृत्व केले आहे. त्यांचे उर्दू भाषेवरही प्रभुत्व आह. त्या भाषेत त्यांनी कविता व नाटके लिहिली आहेत.
राजूरकरांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत. इंग्रजीतील ग्रंथात त्यांनी नेहरूंचे राजकारण, भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी, गांधी व नेहरूंचे तुलनात्मक जीवनविषयक तत्त्वज्ञान, गांधीजींचे राजकीय नेता व विचारवंत म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व, नेहरूंचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कार्य, भारताची धर्मनिरपेक्षता आदी विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यांनी पंडित नेहरूंशी अनेक वेळा चर्चा करून त्यांचे राजकारण समजून घेतले व त्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहे.