"सुलभा ब्रह्मनाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर या मराठी लेखिका वालरोगतज्ज्ञ असून त्यांनी... |
(काही फरक नाही)
|
२३:५३, ४ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर या मराठी लेखिका वालरोगतज्ज्ञ असून त्यांनी इ.स. १९८३मध्ये कर्हाड येथे वेद्यकीय सेवा करायला सुरुवात केली. सन २००२ पासून त्या लिहित्या झाल्या. छात्रप्रबोधन या दिवाळी अंकातील त्यांचा लेख विशेष गाजला. उन्मेष प्रकाशन, मौज प्रकाशन, राजहंस प्रकाशन अशा अनेक प्रकाशकांनी त्यांच्या लेखांना प्रसिद्धी दिली.
सुलभा ब्रह्मनाळकर यांनी लिहिलेली पुस्तके
- गोफ जन्मांतरीचे (२०१२) : उत्कांती आणि जनुकशास्त्र या विषयावरील ग्रंथ
- बंद खिडकीबाहेर (प्रवासवर्णने) : मौज आणि पद्मगंधा दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे.
सुलभा ब्रह्मनाळकर यांना मिळालेले पुरस्कार
- 'गोफ जन्मांतरीचे' पुस्तकाला ललितेत्तर ग्रंथासाठी असणारा डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार (२५-४-२०१३)
- मसापच्या ११०व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रंथकार पुरस्कार (२६-५-२०१३)
- सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त "मिळून साऱ्याजणी‘ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानने सावित्री-जोतिबा समता उत्सवात दिला गेलेला पुरस्कार (१२-३-२०१५)
- विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ संस्थेतर्फे दिला जाणारा ग्रंथगौरव पुरस्कार (२०१४)