Jump to content

"फिदाउल्ला सेहराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: फिदाउल्ला सेहराई (जन्म : बगीचा धेरी (पेशावर), इ.स. १९२८; मृत्यू : पेशा...
(काही फरक नाही)

१४:०५, २१ जुलै २०१६ ची आवृत्ती

फिदाउल्ला सेहराई (जन्म : बगीचा धेरी (पेशावर), इ.स. १९२८; मृत्यू : पेशावर, १९ जून, इ.स. २०१६) हे एक पुरातत्त्व-अभ्यासक होते.

माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर फिदाउल्लाे पेशावरच्या ‘इस्लामिया कॉलेज’ (आता इस्लामिया विद्यापीठ) येथे शिकले आणि तेथून ब्रिटनमधील लायसेस्टरच्या महाविद्यालयात संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी गेले.

पेशावरचा बौद्ध इतिहास

फिदाउल्ला सेहराई मायदेशी परतले तेव्हा पाकिस्तानचा जन्म झाला होता. पेशावरच्या भागाच्या बौद्ध इतिहासाकडे आणि सहाव्या शतकापासूनच गांधार राजांचा पाडाव होऊ लागल्यानंतरही इतिहासाचेे अवशेष आज कसे टिकले आहेत याकडे फिदाउल्ला यांनी जगाचे लक्ष वेधले.