Jump to content

"मंदार लवाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मंदार लवाटे हे पुण्यात राहणारे इतिहास अभ्यासक आहेत. लवाटे...
(काही फरक नाही)

१९:२३, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती

मंदार लवाटे हे पुण्यात राहणारे इतिहास अभ्यासक आहेत. लवाटे १९९९पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी कागदपत्रांवर संशोधन करीत आहेत. त्यांनी २००३ साली महाराष्ट्र शासनाच्या वर्गात मोडीचे शिक्षण घेतले. पुढे ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी त्यांना मोडीतील खाचाखोचा व उर्दू शिकविले. मे २००८पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे त्यांनी मोडीचे अध्यापन वर्ग सुरु केले. त्यांनी आता पर्यंत मोडी लिपीचे ३७ वर्ग (batches) घेतले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र पुराभिलेखागार, पेशवे दफ्तर व भारत इतिहास संशोधक मंडळ येथील अनेक अप्रकाशित कागद त्यांनी उजेडात आणले. दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आदी वृत्तपत्रांत २००० सालापासून आजपर्यंत त्यांचे इतिहास, संस्कृती या विषयावरचे ४००हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. लवाटे यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळून उर्वरित वेळ ते इतिहासाचे संशोधन आणि मोडी लिपीच्या प्रसाराचे कार्य करतात. लवाटे यांचा पुण्याचा इतिहास, पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहास वगैरेंचा अभ्यास आहे.


मंदार लवाटे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके

  • पुणे कृष्णधवल
  • पुण्याची स्मरणचित्रे (छायाचित्रांचा संग्रह, संपादित, सहसंपादक - अजित फाटक)
  • पुण्यातील गणपती मंदिरे
  • पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा
  • सोपी मोडी पत्रे (सहसंपादिका - भास्वती सोमण)