Jump to content

"ब्रह्मेंद्रस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: धावडशीकर ब्रह्मेंद्रस्वामी (१६४९-१७४५) हे छत्रपती पहिले शाहू आ...
(काही फरक नाही)

२३:२१, ९ जुलै २०१६ ची आवृत्ती

धावडशीकर ब्रह्मेंद्रस्वामी (१६४९-१७४५) हे छत्रपती पहिले शाहू आणि पेशवे यांचे गुरू होते. त्यांचे मूळचे नाव विष्णू होते. वर्‍हाडातील दुधेवाडी हे त्यांचे गाव. ते धर्मक्षेत्रांच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या रक्षणाचे काम करीत. पुढे ते काशीला गेले, तेथे त्यांनी संन्यास पत्करला आणि ब्रह्मेंद्रस्वामी हे नाव धारण केले. तीर्थयात्रा करीत करीत ते कृष्णाकाठई आले. तेथे यवनांनी उच्छाद मांडला म्हणून कोकणात आले.

कोकणातील चिपळूणजवळ पेढें गावी परशुरामाचे देवस्थान आहे, तेथें ते राहिले (१६९८). या ठिकाणी बाळाजी विश्वनाथांची व ब्रह्मेंदस्वामींची ओळख झालीं. हळूहळू स्वामींचे भक्तमंडळ वाढत गेले त्यांनी परशुरामाच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठीं भिक्षा मागणे सुरू केले (१७०७). याचवेळीं शाहूची सुटका झाली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथाने शाहूचा पक्ष स्वीकारण्यांत आणि पुढें त्यास पेशवाई मिळवून देण्यांत स्वामींची अतस्थ खटपट असावी असे म्हटले जाते.

परशुरामपंत प्रतिनिधि, कान्होजी आंग्रे, फलटणकर निंबाळकर, नागपूरकर भोंसले, अक्कलकोटर भोंसले वगैरे महाराष्ट्रांतील सर्व प्रमुख मंडळींवर व खुद्द शाहू छत्रपतींवर स्वामींची छाप होती.

(अपूर्ण)