"मंगेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6749003 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''मंगेशी''' [[गोवा|गोव्यामधील]] एक गाव आहे. हे गाव [[ |
'''मंगेशी''' [[गोवा|गोव्यामधील]] एक गाव आहे. हे गाव [[दीनानाथ मंगेशकर|मा. दीनानाथ मंगेशकरांचे]] मूळ गाव आहे. |
||
श्री क्षेत्र मंगेश हे हे गोव्यातले पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे. पूर्वी मंगेश हे दैवत कुठ्ठाळी (कुशस्थळी) येथे होते. पोर्तुगीज लोकांच्या बाटवाबाटवीच्या काळात तिथल्या महाजनवर्गाने मंगेशमूर्ती-लिंग यांना घेऊन होडीत घालून अंतरूज महालात पलायन केले व प्रियोळ गावात मंगेशाची पुनःस्थापना केली. |
|||
श्री मंगेशाचे लिंग सुंदर असून आसनस्थ चेहरा शांत आणि दयार्द आहे. हे स्थनही अत्यंत रमणीय असून देवालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यापर्यंत दुतर्फा नारळीच्या रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून प्राकाराच्या दरवाज्यापर्यंत दोन्ही बाजूंना कठडा बांधून पाखाडी (पक्का रस्ता) केली आहे. प्राकाराच्या पूर्वेकडे उंच तट आहे. तटावर मधोमध चौघड्याची दुमजली इमारत आहे. या तटाच्या पूर्वेला तलाव असून, त्यात मध्यभागी तुळशी वृंदावन आहे. तीन बाजूंनी दुमजली अग्रशाळा आणि मधोमध मंगेशाचे देऊळ आहे. समोर उंच दीपस्तंभ आहे. देवालयाच्या गाभार्यात मुख्य स्थानी मंगेश, पुढे चौकावर नंदिकेश्वर, त्याच्याजवळ ग्रामपुरुष देवशर्मा आणि डावीकडे भगवतीची मूर्ती आहे. याच प्राकारात मूळकेश्वर, लक्ष्मीनारायण, सूर्य, सातेरी, काळभैरव इत्यादी दैवते आहेत. |
|||
एकेकाळी उत्सवात मंगेशीच्या मंदिराच्या प्रांगणात काही अंतरावर रंगमंच उभारला जाई. पडदे, विंगा वगैरे नेपथ्य असे. एका विंगेत पेटी, दुसरीकडे तबला-डग्गा आणि रंगभूमीवर प्रकाश पुरवायला दोन रॉकेलचे दिवे असत. मेकअप म्हणून तोंडाला पिवडी फासली जाई. देऊळ आणि रंगमंच यांमधील मोकळ्या जागेत जमिनीवर सहाशे-सातशे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने नाटक बघायला जमत. रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेले नाटक सकाळच्या सहा-सात वाजेपर्यंत चाले. याच रंगमंचावर [[दीनानाथ मंगेशकर]] पहिल्यांदा रंगभूमीवर आले. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१७:४७, २ जुलै २०१६ ची आवृत्ती
मंगेशी गोव्यामधील एक गाव आहे. हे गाव मा. दीनानाथ मंगेशकरांचे मूळ गाव आहे.
श्री क्षेत्र मंगेश हे हे गोव्यातले पहिल्या क्रमांकाचे हिंदू देवस्थान आहे. पूर्वी मंगेश हे दैवत कुठ्ठाळी (कुशस्थळी) येथे होते. पोर्तुगीज लोकांच्या बाटवाबाटवीच्या काळात तिथल्या महाजनवर्गाने मंगेशमूर्ती-लिंग यांना घेऊन होडीत घालून अंतरूज महालात पलायन केले व प्रियोळ गावात मंगेशाची पुनःस्थापना केली.
श्री मंगेशाचे लिंग सुंदर असून आसनस्थ चेहरा शांत आणि दयार्द आहे. हे स्थनही अत्यंत रमणीय असून देवालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यापर्यंत दुतर्फा नारळीच्या रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून प्राकाराच्या दरवाज्यापर्यंत दोन्ही बाजूंना कठडा बांधून पाखाडी (पक्का रस्ता) केली आहे. प्राकाराच्या पूर्वेकडे उंच तट आहे. तटावर मधोमध चौघड्याची दुमजली इमारत आहे. या तटाच्या पूर्वेला तलाव असून, त्यात मध्यभागी तुळशी वृंदावन आहे. तीन बाजूंनी दुमजली अग्रशाळा आणि मधोमध मंगेशाचे देऊळ आहे. समोर उंच दीपस्तंभ आहे. देवालयाच्या गाभार्यात मुख्य स्थानी मंगेश, पुढे चौकावर नंदिकेश्वर, त्याच्याजवळ ग्रामपुरुष देवशर्मा आणि डावीकडे भगवतीची मूर्ती आहे. याच प्राकारात मूळकेश्वर, लक्ष्मीनारायण, सूर्य, सातेरी, काळभैरव इत्यादी दैवते आहेत.
एकेकाळी उत्सवात मंगेशीच्या मंदिराच्या प्रांगणात काही अंतरावर रंगमंच उभारला जाई. पडदे, विंगा वगैरे नेपथ्य असे. एका विंगेत पेटी, दुसरीकडे तबला-डग्गा आणि रंगभूमीवर प्रकाश पुरवायला दोन रॉकेलचे दिवे असत. मेकअप म्हणून तोंडाला पिवडी फासली जाई. देऊळ आणि रंगमंच यांमधील मोकळ्या जागेत जमिनीवर सहाशे-सातशे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने नाटक बघायला जमत. रात्री अकराच्या सुमारास सुरू झालेले नाटक सकाळच्या सहा-सात वाजेपर्यंत चाले. याच रंगमंचावर दीनानाथ मंगेशकर पहिल्यांदा रंगभूमीवर आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |