"मा.ना. आचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
जुन्या संस्कृत ग्रंथांचा आणि अर्वाचीन संतवाङ्मयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. जुन्या ग्रंथांमधून जे संदर्भ सापडतात त्यांचा सातत्याने शोध घेणे हे आचार्य यांचेे वैशिष्ट्य आहे. एखादा फारसा परिचित नसलेला शब्द आचार्यांच्या कानांवर पडला किंवा त्यांच्या वाचनात आला की, त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भाकडे ते वळतात. मग जुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्याकडे त्यांची दृष्टी जाते आणि त्या शब्दाचा, त्यानिमित्ताने त्यामागे दडलेल्या पुराणकथांचा व त्यांच्या विविध आवृत्त्यांचा ते शोध घेतात. |

‘आलोचना’, ‘भाषा आणि जीवन’, ‘ललित’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांमध्ये ते नेमाने लेखन करीत. |
‘आलोचना’, ‘भाषा आणि जीवन’, ‘ललित’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांमध्ये ते नेमाने लेखन करीत. अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयातील ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. |
||
==मा.ना. आचार्य यांची पुस्तके== |
==मा.ना. आचार्य यांची पुस्तके== |
०६:२६, २१ जून २०१६ ची आवृत्ती
प्रा. माधव नारायण आचार्य हे एक अभ्यासू लेखक आहेत. त्यांचे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. आचार्य यांनी सुरुवातीला अलिबागमधील चौलमध्ये राहून आपल्या वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणापुरते ते मुंबईत आले. चौलसारख्या छोट्या गावात राहूनही त्यांनी साहित्य-संशोधनात हयात घालविली. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते.
जुन्या संस्कृत ग्रंथांचा आणि अर्वाचीन संतवाङ्मयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. जुन्या ग्रंथांमधून जे संदर्भ सापडतात त्यांचा सातत्याने शोध घेणे हे आचार्य यांचेे वैशिष्ट्य आहे. एखादा फारसा परिचित नसलेला शब्द आचार्यांच्या कानांवर पडला किंवा त्यांच्या वाचनात आला की, त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भाकडे ते वळतात. मग जुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्याकडे त्यांची दृष्टी जाते आणि त्या शब्दाचा, त्यानिमित्ताने त्यामागे दडलेल्या पुराणकथांचा व त्यांच्या विविध आवृत्त्यांचा ते शोध घेतात.
‘आलोचना’, ‘भाषा आणि जीवन’, ‘ललित’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांमध्ये ते नेमाने लेखन करीत. अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयातील ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
मा.ना. आचार्य यांची पुस्तके
- अनुषंग
- आर्याभारत नवदर्शन
- कारुण्यकोकिळा
- ध्वनितांचें केणें (म्हणजे गूढार्थाचे गाठोडे. हा ज्ञानेश्वरीतील शब्द आहे.)
- ‘पञ्चपदी’ ज्ञानेश्वरी
- मराठी व्याकरणविवेक
- मोरोपंत श्लोक केकावली
- संतसाहित्य कथासंदर्भकोश
- संतांच्या अम्लान कथा
- ज्ञानमयूरांची कविता