"संतसाहित्य कथासंदर्भकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''संतसाहित्य कथासंदर्भकोश''' हा प्रा. माधव नारायण आचार्य यांनी तया... |
(काही फरक नाही)
|
१८:३४, २० जून २०१६ ची आवृत्ती
संतसाहित्य कथासंदर्भकोश हा प्रा. माधव नारायण आचार्य यांनी तयार केलेला एक अभूतपूर्व कोश आहे. ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंतच्या पाच संतांच्या वेचक वाङ्मयात ग्रथित झालेल्या कथासंदर्भांची यथास्थित उकल करणारा हा कोश आहे. मा.ना आचार्य यांनी रामायण, महाभारत, भागवत, कथाकल्पतरू, नवनाथ भक्तिसार, विविध लोककथा इत्यादींचा धांडोळा घेऊन त्यांनी हे कथासंदर्भ कोशात नोंदविले आहेत.
उदाहरणार्थ, नामदेवांच्या अभंगांत विदुराच्या कण्या, द्रौपदी वस्त्रहरण, श्रीकृष्णावतार, पूतनावध असे जे उल्लेख आले आहेत,. त्यासंबंधीच्या कथांची यथोचित उकल कोशामध्ये केली आहे.
शिवाचे वेगवेगळे संदर्भ ज्ञानेश्वरीत येतात. त्या संदर्भांशी संबंधित अशा कथा भागवताच्या तसेच पुराणाच्या आधारे आचार्य यांनी सांगितल्या आहेत. भरताच्या नाट्यशास्त्राच्या चौथ्या अध्यायात तांडव आणि लास्य या दोन नृत्यप्रकारांचा उल्लेख येतो. त्यांचेही अर्थनिरूपण या कोशात आले आहे.
'एकनाथी भागवत' हा ग्रंथ म्हणजे वेगवेगळ्या कथांचा खजिनाच आहे. पुराणांत आणि भागवतात येणार्या अनेक कथा एकनाथी भागवताचा विषय झाल्या आहेत. अनेकविध व्यक्तींच्या स्वभावधर्मानुसार त्यांच्या आयुष्यात घडलेल्या निरनिराळ्या प्रसंगांचे महत्त्व सुस्पष्ट होईल अशा प्रकारे मा. ना. आचार्य यांनी वेगवेगळी कथारहस्ये या कोशात उलगडून दाखविली आहेत.