Jump to content

"कार्टूनपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कार्टूनपट म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर दाखवली जाणारी हलत्या बोल...
(काही फरक नाही)

०५:४३, १९ जून २०१६ ची आवृत्ती

कार्टूनपट म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर दाखवली जाणारी हलत्या बोलत्या व्यंगचित्रांची मालिका. या कार्टूनपटांना कथानकही असते. कार्टूनपटांच्या निमित्ताने चित्रपटात दिसणारी अनेक पात्रे अजरामर झाली. त्यांपैकी काही ही :

  • मिकी माउस (१९२८) : वॉल्ट डिस्ने कंपनीने लोकप्रिय केलेला उंदीर. हा उंदीर लाल चड्डी, पिवळट रंगाचे मोठे बूट आणि पांढरे मोठे मोजे असे विशिष्ट कपडे घालतो.
  • डोनाल्ड डक (१९३४) : वॉल्ट डिस्ने कंपनीचे लोकप्रिय पात्र. हे एक बदक असून त्याच्या घोगर्‍या आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने ते मुलांमध्ये प्रिय झाले. सततचा धांदरटपणा आणि थोडासा रागीट स्वभाव धमाल उडवतो. तो कायम चांगले काही करायला जातो, पण नशीब त्याला साथ्देत नाही. आणि तरीही तो नाउमेद होत्नाही.
  • टॉम अॅन्ड जेरी (१९४०) : जोसेफ बार्बरा व विल्यम हॅना यांनी निर्माण केलेली हे कार्टूनपटातील पात्रे आहेत. यातला एक उंदीर आहे आणि दुसरे मांजर. ही पात्रे असलेल्या कार्टूनपटांनीसात वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.
  • निन्जा हटोरी (१९६४) : जपानी कलाकार मोटो अबिको याने निर्माण केलेले पात्र. हे पात्र असलेल्या कार्टूनपटातील ११ वर्षे वयाच्या केनिची मिस्तुबा नावाच्या आळशी मुलाची दोस्ती निन्जा हटोरीशी होते.
  • डोरेमॉन (१९६९) : फूजिको आणि फूजियो यांच्या कार्टूनपटातील हे पात्र आहे. नोबिता, शिजुका, सुनियो, जिआन ही डोरेमॉन पटातील अन्य पात्रे आहेत. या पात्रांच्या द्वारे डोरेमॉन मुलांना चांगली शिकवणी देतो.
  • बॉब द बिल्डर (१९८०) : कॅथ चॅपमॅनने निर्माण केलेले या पात्राच्या तोंडी ‘हम इसे ठीक कर सकते हैं’ अशा अर्थाचे वाक्य असते. हा आवाज ब्रिटिश अभिनेता नील मॉरसीचा आहे. बॉब वेगवेगळ्या बांधकामांवर आपल्या मशीन-मित्रांसह काम करतो.
  • मोटू-पतलू (२०१२) : कृपाशंकर भारद्वाज याने निर्माण केलेली ही जिवलग मित्र असलेली पात्रे.. मोटू नशीबावर विश्वास ठेवणारा तर पतलू कष्टांवर. हे दोघे आणि जॉन द डॉन, घसीटा राम, डॉक्टर झटका, इन्स्पेक्टर सिंघम हे लोक फुरफुरीनगरचे रहिवासी आहेत.या पात्रांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची चित्रे मुलांच्या दप्‍तरांवर, वह्यांवर, पॅन्ट्‌सवर आणिवॉटर बॅग्जवर दिसतात.
  • मायटीराजू (२०१४) : संदीप चिका या भारतीयाने कार्टून चित्रमालिकांत आणलेले हे पात्र म्हणजे आर्यनगरमध्ये राहणारा चार वर्षाचा राजू नावाचा मुलगा. त्याचे वडील शास्त्रज्ञ आहेत. राजू आपल्या धडपडीने तो रहात असलेल्या शहराला आणि कधी कधी पृथ्वीलाही संकटातून वाचवतो. पोलीस इन्स्पेक्टर खन्‍ना यांना तो नेहमीच मदत करतो. राजू सोबल या व्यंगचित्र मालिकेत संध्या, मोबी, स्वामी, चार्ली, चुटीला आणि ज्यूली ही पात्रे असतात.