"विद्या हर्डीकर-सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विद्या अशोक हर्डीकर-सप्रे या अमेरिकेत स्थायिक झालेल्या एक मराठी...
(काही फरक नाही)

०७:०८, १४ जून २०१६ ची आवृत्ती

विद्या अशोक हर्डीकर-सप्रे या अमेरिकेत स्थायिक झालेल्या एक मराठी लेखिका आहेत. य.वि हर्डीकर हे वडील, व सुमती हर्डीकर या त्यांच्या आई. विद्या हर्डीकर-सप्रे यांनी २०१२ सालच्या दिवाळीत ‘ग्रंथाली अमेरिका’ नावाचा एक ई-अंकही काढला होता.

विद्या हर्डीकर-सप्रे यांची प्रकाशित पुस्तके

  • अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन (ग्रंथाली प्रकाशन)
  • नातीं आणि स्मृती (घराच्या, कुटुंबीयांच्या आणि अन्य नातेवाइकांच्या आठवणी, सर्वोत्तम प्रकाशन)
  • निरंतर (कथासंग्रह, सहलेखिका संध्या कर्णिक, मातृभूमी सेवा ट्रस्ट प्रकाशन)
  • मांजरफन (ललित आणि विनोदी लेखांचा संग्रह, ग्रंथाली प्रकाशन)
  • संवादने (अनुभव कथन, ग्रंथाली प्रकाशन)