"एल्डा एमा अँडरसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एल्डा एमा अॅन्डरसन (जन्म : गेरीन लेक-विस्कॉन्सिन-अमेरिका, ५ ऑक्टो...
(काही फरक नाही)

१२:०८, १२ जून २०१६ ची आवृत्ती

एल्डा एमा अॅन्डरसन (जन्म : गेरीन लेक-विस्कॉन्सिन-अमेरिका, ५ ऑक्टोबर, इ.स. १८९९; मृत्यू : ओक रिज, टेनेसी-अमेरिका, १२ एप्रिल, इ.स. १९६१) ही एक अमेरिकन वैज्ञानिक होती. लहानपणापासूनच तिला गणितामध्ये खूप रस होता.

शिक्षण

इ.स.१९२२मध्ये एल्डाने रिपन कॉलेजातून बॅचलर ऑफ आर्ट्‌स (AB) ची पदवी घतली. विस्कॉन्सिन विद्यापीठातून ती १९२४ साली मास्टर ऑफ आर्ट्‌स (AM) झाली.

अध्यापन

१९२४ ते १९२७ या कालावधीसाठीे एल्डा अॅन्डरसनने आयोवाच्या एका कॉलेजात प्रोफेसर झाली आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांची डीन झाली. १९२९ साली ती मिलवॉकी-डाउनर कॉलेजात फिजिक्सची प्राध्यापक होऊन १९३४ मध्ये फिजिक्स डिपार्टमेन्टची प्रमुख झाली.