"माधव नामजोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. माधव नामजोशी (जन्म : इ.स. १९४८; मृत्यू: ३० मे, इ.स. २०१६) हे पुणे|पुण... |
(काही फरक नाही)
|
२३:३६, ११ जून २०१६ ची आवृत्ती
डॉ. माधव नामजोशी (जन्म : इ.स. १९४८; मृत्यू: ३० मे, इ.स. २०१६) हे पुण्यातले एक होमिओपॅथी डॉक्टर होते. गरजू रुग्णांची ते विनामूल्य तपासणी करत असत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी रुग्णांना उपचार केले.
शैक्षणिक कार्य
डॉ. नामजोशी यांना वनस्पतिशास्त्र या विषयाची विशेष आवड होती. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही अभ्यासक्रमही सुरू केले होते.
पुण्यातील मॉडर्न हायस्कूल आणि कोलेज चालवणार्या प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे ते शेवटची तीस वर्षे सदस्य, व बावीस वर्षे उपकार्याध्यक्ष होते.
सोसायटीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘मॉडर्न सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅन्ड रिसर्च’ ही संस्था उभारण्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते.
त्यांच्या पत्नी कल्याणी नामजोशी या पी.ई. सोसायटीच्या उपाध्यक्ष आहेत.