"पंजाब मेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पंजाब मेल ही मुंबईहून सुटणारी एक आगगाडी आहे. ही गाडी पहिल्यांदा १... |
(काही फरक नाही)
|
२२:१६, १० जून २०१६ ची आवृत्ती
पंजाब मेल ही मुंबईहून सुटणारी एक आगगाडी आहे. ही गाडी पहिल्यांदा १ जून १९१२ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पिअर मोल स्थानकातून सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरकडे जाण्यासाठी सुटली. धावण्याचा एवढा २४९६ किलोमीटरचा दीर्घ पल्ला असलेली त्या काळची ती पहिली आणि सर्वात जलद गाडी होती. हे अंतर पार करण्यास तिला ४७ तास लागत. सुरुवातीला ही गाडी रोज सुटत नसे; टपाल नेण्याच्या दिवशीच ही प्रवासाला निघे. गाडीला तीन डबे होते आणि त्यांत एकूण ९६ उतारू सामावले जात.
‘दि पंजाब लिमिटेड’ हे या गाडीचे सुरुवातीचे नाव. जेव्हा ही गाडी मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसवरून सुटू लागली, तेव्हा हिचे नाव ‘पंजाब मेल’ झाले. पंजाब मेलला आता पँट्री कार धरून २३ डबे आहेत. ही गाडी आता मुंबई व्ही.टी.वरून सुटून भारताच्या पंजाब प्रांतातील फिरोझपूर कँटॉनमेन्ट या स्टेशनापर्यंत धावते. या गाडीचा आधीचा नंबर 5 Down/6 Up असा होता, आता तो 12137/12138 असा आहे.