"शैलेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: शैलेंद्र (जन्म : रावळपिंडी, ३० ऑगस्ट १९२३, मृत्यू : ) हे कवी आणि हिंद... |
(काही फरक नाही)
|
०६:२१, २९ मे २०१६ ची आवृत्ती
शैलेंद्र (जन्म : रावळपिंडी, ३० ऑगस्ट १९२३, मृत्यू : ) हे कवी आणि हिंदी चित्रपटांचे गीतकार होते.
शैलेंद्र यांचे वडील लष्करात होते. वडील रिटायर झाल्यावर हे कुटुंब मथुरेला स्थायिक झाले.. तिथेच शैलेंद्रांचे शिक्षण झालं. त्यांच्या घरी उर्दू आणि फारशीची परंपरा होती. परंतु शाळेत असताना त्यांना राष्ट्रीय विचारांची प्रेरणा मिळाली. १९४२ साली इंजिनीयरिंग शिकण्यासाठी शैलेंद्र मुंबईला आले. रेल्वेत नोकरी मिळाली. ऑगस्ट १९४२ च्या चळवळीत तुरुंगवास झाला. कवितेची आवड मनात होतीच. ऑगस्ट १९४७ मध्ये मुंबईत एक कविसंमेलन झालं. तिथे शैलेंद्रांनी आपल्या कविता सादर केल्या. राज कपूर कविसंमेलनाला आले होते. त्यांना कविता आवडल्या. आणि ‘आग’ चित्रपटासाठी गाणी लिहावीत असे त्यांनी शैलेंद्रांना सुचवलं. परंतु ते जमले नाही. १९४८ साली शैलेंद्रांचे लग्न झाले आणि वाढता घरखर्च भागेना, म्हणून ते राज कपूरकडे गेलो. त्यांनी मला ‘बरसात’ची गाणी लिहिण्याची संधी दिली. गाणी इतकी लोकप्रिय झाली की पुढे शैलेंद्र हिंदी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे गीतकार झाले.